५५०फूट उंच स्काँटिश कडा सर करून हुतात्म्यांना वाहिली आदरांजली

■महाराष्ट्र दिना निमित्ताने कल्याणच्या सहयाद्री रॉक ऍडव्हेंचरची कामगिरी   कल्याण :    सह्याद्रीच्या पर्वत रांगेत फिरतांना असंख्य आणि मनात धडकी भरवणारे सुळखे आणि कडे दृष्टीसमोर येतात. त्यातच सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या हरिहर गडाच्या बाजूचा भीमकाय कडा म्हणजे "स्कॉटिश कडा". कल्याण च्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा कडा सर करीत एकत्रित महाराष्ट्र हितासाठ बलिदान केलेल्या हुतात्म्यांना  आदरांजली वाहण्यात आली.      

 

 

स्कॉटिश कडा हा नाशिक जिल्ह्यातील त्रिम्बकेश्वर परिसरात असुन   सुमारे ५५० फूट भली मोठी उंची असलेला हा कडा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या इतर कडयांपैकी सर्वात उंच आणि गिर्यारोहण क्षेत्रात तांत्रिक गोष्टी चा विचार केला तर कड्याच्या वरून ते कड्याच्या पायथ्या गिर्यारोहणाचा सेटअप लावणारा एकमेव कडा, मुख्यतो इतर ठिकाणी पायथ्यापासून सुरुवात करून वर जातानाचा सेटअप लावला जातो. स्कॉटिश कड्याला जायला मुख्यतो दोन मार्ग लागतात.एक म्हणजे त्रिम्बकेश्वर च्या निरगुडपाड्या येथून तर दुसरा हर्षेवाडीचा.


 

महाराष्ट्र दिनाच्या ह्या विशेष मोहिमेची सुरुवात निरगुडपाडा येथून चालू  करीत सुमारे २ तासाचा ट्रेक करीत स्कॉटिश कड्याच्या पायथ्याशी सहयाद्री रॉक ऍडव्हेंचर संघाचे सदस्य  पोहचले. अंगा खांद्यावर भगवे झेंडे आणि गिर्यारोहणाचे अवजड साहित्य घेऊन आरोहणाची सुरुवात झाली. कड्यावर दोरीच्या साहित्याने सहयाद्री रॉक ऍडव्हेंचर संघाने सेटअप हा लावला होता. त्यावर झुमरिंग करून एक एक गिर्यारोहक हा हळू हळू कड्याच्या टोकाकडे वाट करत होता. सुमारे ६ स्टेशनमध्ये विभागलेला स्कॉटिश कडा ज्यावर प्रत्येक स्टेशनवर सहकार्य साठी नेमलेले सहयाद्री रॉक ऍडव्हेंचरचे स्वयंसेवक इतरांना वर यायला मदत करत होते.


कडा खूपचं उंच असल्याने गिर्यारोहकांना अतिशय दमछाक  होत असताना मोहीम सुखरूप पार पडावी म्हणून कड्याच्या पायथ्याशी शिवरायांची आरती करण्यात आली. तसेच कड्याला धन्यवाद म्हणून कड्याचे पूजन करण्यात आले. मोहिमेत विशेष आकर्षण ठरले ते ग्रीहिता विचारे ह्या लहान मुलीचा मोहिमेत सहभाग होता. या विशेष मोहिमेत सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरचे पवन घुगे, दर्शन देशमुखरणजित भोसलेभूषण पवार, प्रदीप घरतनितेश पाटील, सुनील खनसे, कल्पेश बनोटे आणि प्रशिल अंबाडे हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments