ते भिवंडी बायपास मार्गे यायचे नी सोनसाखळी चोरी करायचे पाच –सहा वेळा रचला होता सापळा


डोंबिवली ( शंकर जाधव ) अगदी सहज पैसा मिळावा आणि त्यावर मौजमजा करण्यासाठी त्या दोघांनी सोनसाखळी चोरीची योजना बनवली. कल्याण-डोंबिवलीत शहरात चोरी करण्यासाठी ठरवल्यावर दोघांनी रात्रीच्या अंधारात मोटरसायकलीवरून यायचे. रस्त्यावरील एकटी महिला दिसल्यावर त्याच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पोबारा करायचे. अनेक दिवस असे प्रकार सुरु असल्याने आपण पकडले जाणार नाही या भ्रमात या दोघांनी चोरी करणे सुरूच ठेवले.मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी तपास यंत्रणा चोरट्यांची माहिती काढत होती.रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरटे भिवंडी बायपास मार्गे यायचे नी सोनसाखळी चोरी  करून पुन्हा त्याचा मार्गाने भिवंडीला जात असल्याचे दिसले. पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यासाठी पाच-सहा वेळा सापळा रचला होता. अखेर चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी चोरट्यांना बेड्या ठोकून गजाआड केले.

   


पोलिसांनी कडून मिळालेल्या माहितीनुसार,रमेश हिरालाल पालीवाल ( ३४, रा.पद्मा चाळ, वऱ्हाड देवी रोड, भिवंडी – मुळचे राजस्थानचे ) आणि महेश पुनाराम जठ ( ३५ ,रा.लक्ष्मी दर्शन बिल्डींग ,कोंबडपाडा, शिवाजी चौक, भिवंडी, मुळचे राजस्थान ) असे अटक सोनसाखळी चोरट्यांचे नाव आहे.या दोघांवर डोंबिवलीतील मानपाडा. टिळकनगर, विष्णूनगर आणि कल्याण मधील खडकपाडा , कोळसेवाडी  पोलीस ठाण्यात एकूण ९ गुन्हे दाखल आहेत.मुंबईतील पालघर आणि ठाणे जिल्यार एकूण २९ जबरी चोरी आणि चोरीचे गुन्हे नोंद आहे.कल्याण-डोंबिवलीत अनेक दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी यात तपास करून चोरट्यांना पकडल्याचे ठरविले.सीसीटीव्ही फुजेज तपासले असता हे चोरते भिवंडी बाय मार्गे मोटरसायलीवरून यायचे.ते ज्या मार्गाने शहरात येत होते त्याठिकाणी पोलिसांनी सापळा रचून चोरट्यांना पकडले.        

  


 सदरची कामगिरी पोलीस सह आयुक्त,कल्याण परिमंडल -३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळडोंबिवली सहायक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांच्या  मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि शेखर बागडेसपोनिरी अविनाश वनवेअनिल भिसेसुनिल तारमळे, पोहवा राजेंद्र खिल्लारे, विजय कोळीभानुदास काटकर, सोमनाथ टिकेकर,सुधीर कदम,पोना संजू मासाळ, प्रविण किनरेदिपक गडगे,भारत कांदळकर,महादेव पवार, यल्लपा पाटील,पोशि अशोक आहेर, सोपान काकड महेंद्र मंझा, कसबे,प्रशांत वानखेडे, अशोक काकडे, सुशांत तांबे,पोशी संतोष वायकर,ताराचंद सोनावणे यांनी बजावली. चौकट


 

सोनसाखळी चोरटे रमेश चहिरालाल पालीवाल आणि महेश पुनराम जेठ हे  इराणी कबिल्यातील लोकांसारखे  दिसतात. पोलिसांनी दोघांना अटक  केल्यावर ते मुळचे राजस्थानचे 

असल्याचे  स्पष्ट झाले. या दोघा चोरट्यांवर  मुंबईतील पालघर  आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात एकूण २९ जबरी चोरी आणि चोरीचे गुन्हे दाखल  असल्याची माहिती कल्याण परिमंडल -३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी माहिती दिली.रस्त्यावरील  एकट्या महिलांना टार्गेट करून त्याच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पल काढण्यात दोघे चोरते तरबेज होते.  सोन्याचे दागिने घालून महिलांनी घराबाहेर पडू नये. रस्त्यावरून पायी चालताना समोरून अथवा पाठीमागून मोटरसायकलीवरून  येणाऱ्यांकडे लक्ष द्यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments