रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा प्रवाशाची रिक्षात विसरलेली बॅग परत केली


कल्याण : कल्याणमध्ये रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा पुन्हा एकदा समोर आला असून प्रवाशाची रिक्षात विसरलेली बॅग या रिक्षाचालकाने परत केली आहे. हौशिला प्रसाद मिश्रा यांच्या रिक्षात अज्ञात प्रवासी यांची महत्वाचे कागद पञे व चीजवस्तू असलेली बॅग रिक्षात विसरले.


रिक्षाचालक मिश्रा यांनी रिक्षा चालक मालक असोसिएशनच्या जनसंपर्क कार्यालयात प्रवाशाची विसरलेली बॅग प्रामाणिक पणे जमा केली. असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी चौकशी व प्रवासी यांचा शोध घेऊन कुशल हरीराम कुमार यांचीच बॅग असल्याची खातरजमा करून त्यांना ती परत केली. कुशल कुमार यांनी रिक्षाचालकाच्या प्रामाणिक पणाचे कौतुक केले व रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments