शिवसंपर्क अभियान टप्पा २ मार्गदर्शन शिबिर संपन्न खासदार राजन विचारे

ठाणे,  प्रतिनिधी : - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसंपर्क अभियानाला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यापैकी पहिला टप्पा गोंदिया येथे संपन्न होऊन शिवसंपर्क अभियान टप्पा - २ अंतर्गत आज पनवेल जिल्हा मध्यवर्ती शाखा येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी जमलेल्या शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या संपर्क अभियानाची प्रमुख जबाबदारी राजन विचारे यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे.


यावेळी आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख श्री.शिरीष घरत, श्री. मनोहर भोईर, श्री. अनिल नवघणे, जिल्हा सल्लागार  श्री. बबन पाटील, महिला जिल्हा संघटक सौ. रेखाताई ठाकरे, रायगड जिल्ह्यामधील सर्व उपजिल्हाप्रमुख, विभाग प्रमुख, शहर प्रमुख व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या शिवसंपर्क अभियानास अनेक मान्यवरांनी आपले मोलाचे मार्गदर्शन या शिबिरामध्ये पदाधिकाऱ्यांना दिले. नुकताच येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद महानगरपालिका यांच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास निश्चित होत आल्या आहेत. पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड या विधानसभा मतदार संघात शिवसंपर्क अभियानास दिनांक २६ मे ते २८ मे पर्यंत सुरू राहणार आहे.


या महा विकास आघाडीला दोन वर्षाहून अधिक कालावधी गेलेला आहे. त्यातील बहुतांश कालावधी कोविड-१९ मुळे अतिशय नेटाने व नियोजनबद्ध रीतीने मुकाबला केल्याने अख्या महाराष्ट्राचे कौतुक तसेच माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी घेतलेल्या निर्णयाचे अनुकरण इतर राज्यांनीही केले. या कालावधीत राज्यात एका मागून येणारी नैसर्गिक आपत्ती तसेच येणाऱ्या संकटाचे रूपांतर त्यांनी संधीत केले. त्याच मुळे विविध रोग व साथीचा मुकाबला आपण सक्षम पणे करू शकतो असा आत्मविश्वास महाराष्ट्रातील जनतेला व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला. 


राज्यात होणारी बेरोजगारी दूर व्हावी नवनवीन योजना नुसत्या आणल्या नाही तर त्या राबवून दाखवल्या पाहिजेत. पर्यटन व्यवसायात रोजगाराची संधी निर्माण करून लोकांमध्ये आत्मविश्वास जागवला. या सरकारच्या योजना खेडोपाड्यात पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्रित आणून प्रत्येक तालुक्यातील गावातील घराघरात योजना पोचविण्यासाठी शिवसंपर्क अभियानाचे मूळ उद्दिष्ट “गाव तिथे शाखा” असा आहे.

Post a Comment

0 Comments