धूळ आणि धुराचा वाहतूक पोलिसांच्या आरोग्यावर परिमाण .. डोळ्यांची मोफत होणार तपासणी


डोंबिवली ( शंकर जाधव ) कडक उन्ह , मुसळधार पाऊस आणि कडाक्याची थंडीत अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांच्या आरोग्यावर परिमाण होत असतो.गृहखात्याने पोलिसांचे आरोग्य व्यवस्थित रहाव्या याकरता त्याच्या फिटनेस लक्ष दिले. मात्र वाहतूक पोलिसांच्या आरोग्याबाबत गृहखात्यांकडून पुरेसे लक्ष जात नसल्याचे दिसते.


         अश्यावेळी काही सामाजिक संस्था व रुग्णालये पोलिसांच्या मदतीला धावून येतात.डोंबिवलीतील 
मनस्वी स्पाईन आणि अर्थोकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून वाहतुक पोलिसांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना मोफत छत्र्या व सन-गॉगलचे वाटप केले. 


     यावेळी डोंबिवली वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते आणि हॉस्पिटलचे अधिकारी नितीन अहिरे उपस्थित होते. हॉस्पिटलच्या या कार्याचे कौतुक करीत पोलीस कर्मचाऱ्यांना होत असलेल्या उन्हाच्या त्रासाची दखल घेणे ही सामाजिक बांधिलकी जपली आहे ही विशेष बाब असल्याचेही गीते यांनी सांगितले.


       तर हॉस्पिटल तर्फे वाहतुक पोलीस कर्मचाऱ्यांचे डोळे तपासणी शिबीर घेण्यात येईल असेही नितीन अहिरे यांनी सांगितले. डोंबिवली वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी छत्री व गॉगल वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments