ट्रेडस्मार्ट कडून ग्राहकां मध्ये ५७ टक्के वाढीची नोंद महाराष्ट्रात सर्वाधिक व्यापा-यांची नोंद ~

 


मुंबई, १० मे २०२२: ट्रेडस्मार्ट या भारतातील आघाडीच्या नवीन युगातील डिस्काउंट ब्रोकरेज कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने भारतातील ग्राहकांमध्ये ५७ टक्के वाढीची नोंद केली आहे. यंदा व्यासपीठाने महाराष्ट्रामधून सर्वाधिक व्यापा-यांची नोंद केली. राज्यातील ६८ टक्के व्यापारी मिलेनियल्स व जनरेशन झेड व्यक्ती आहेत. वाढती बाजारपेठ तसेच वाढणारे स्मार्टफोन युजर्स ही अभूतपूर्व वाढीची काही कारणे आहेत.


ट्रेडस्मार्टला व्यासपीठावर महिला व्यापा-यांमध्ये ४ टक्क्यांची वाढ दिसण्‍यात आली, ज्यामधून पुरूषांचे वर्चस्व असलेल्या उद्योगाबाबतचा समज मोडून काढत महिला सहभागींच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. व्यासपीठावर ५१ ते ६० वर्षे वयोगटातील व्यापा-यांमध्ये काहीशी वाढ झाल्याचे देखील निदर्शनास आले.


सर्व व्यवहारांपैकी ९६ टक्क्यांहून अधिक व्यवहार एनएसईअंतर्गत करण्यात आले. ट्रेडस्मार्ट या नवीन आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये आशादायक वाढीची अपेक्षा करत आहे.

Post a Comment

0 Comments