भिवंडीत सुसाट वेगात असलेल्या टेम्पोने सहा जणांना उडवले, एक ठार, पाच जखमी...


भिवंडी दि 4(प्रतिनिधी ) वज्रेश्वरी देवीच्या यात्रेत चालत जाणाऱ्या सहा  भाविकांना टेम्पो ने उडवले असून या अपघातात एका आदिवासी तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर  पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना अकलोली कॉलनी इथं  घडली पालघर जिल्ह्यातील आदिवासी  कुटुंब मोलमजुरी करण्यासाठी तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी जवळील  सैतानी पूल येथे वास्तव्यास आहेत त्यापैकी आठ जण वज्रेश्वरी देवी ची यात्रा फिरण्यासाठी चालत निघाले असता टेम्पोच्या धडकेत काशीराम गावा वय 45 यांचा जागीच मृत्यू झाला .


तर सुनिता, कविता चिंता,  राधिका, सविता गावा अन्य एक असे पाच जण  गंभीर जखमी झाले आहे  या  मजुरांना उडावल्यानंतर चालकाने  तिथून पलायन केले असून या  घटनेनंतरलगेच स्थानिकांनी 108 रुग्णवाहिकेचे  व्यवस्थापक मिलिंद कांबळे यांना सदर घटनेची माहिती दिल्यावर त्यांनी 108 रुग्णवाहिकेत प्रवीण तांडेल यांच्यासह धाव घेऊन जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात  दाखल करून उपचार केले.


 तर मृत्यू झाल्याचा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी   इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात पाठविण्यात आला आहे  सदर ठिकाणी गणेशपुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेंद्र गावडे यांनी  मदत कार्य केले सदर घटनेची पोलिस ठाण्यात  नोंद करण्यात आली आहे..

Post a Comment

0 Comments