कल्याण - डोंबिवलीत जातीय भोंगा वाजणार नाही... कॉंग्रेस पदाधिकारी संतोष केणेडोंबिवली ( शंकर जाधव ) भोंगा हा विषय सध्या देशभर गाजत आहे.याबाबत मनसेने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर विविध पक्षांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या.यावर सरकारमध्ये असलेल्या कॉंग्रेसने सर्व धर्मात सलोखा असून कायदासर्वाना समान असल्याचे सांगितले.कल्याण-डोंबिवलीत जातीय भोंगा वाजणार नाही असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सचिव संतोष केणे यांनी डोंबिवलीत व्यक्त केला.


    महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सचिव केणे म्हणाले, २०२० पासून २०२२ पर्यत कोरोना महामारीत सर्वांनी एकत्र येऊन माणसांचे जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. या काळात सर्वांनी एकत्र येऊन माणुसकीचा धर्म पाळला.त्यावेळी कोणताही धर्म जात मोठा नव्हता. धार्मिक विषयवार आरोप झाले नाही.आता मात्र वेगळे वातावरण दिसत आहे.म्हणून सर्वांनी कोरोना काळात एकमेकांना कशी मदत केली हे विसरू नये. कायदा हा सर्वाना समान आहे.


      धार्मिक तेढ निर्माण होईल अश्या विषयाकडे कोणीही लक्ष देऊ नये.आपला आर्थिक विकास कसा होईल ?  देशाची प्रगती कशी होईल याकडे कडे लक्ष दिले पाहिजे.त्यामुळे कोणी कितीही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्याकडे नागरिकांनी कानाडोळा करा. कल्याण-डोंबिवलीत जातीय भोंगा वाजणार नाही असेही केणे म्हणाले.

Post a Comment

0 Comments