कल्याण, कुणाल म्हात्रे : कल्याणमध्ये मशिदींसोबतच मंदिरांबाहेरही पोलीसांचा पहारा असल्याचे दिसून आहे.
कल्याणात पहाटेची पहिली अजाण भोंग्या विना झाली तर इतर अजान ह्या कमी आवाजात देण्यात आल्या. आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ५० हून अधिक मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या होत्या तर २९ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यायाबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मशिदीवरील भोंग्या समोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते नागरिकांना केलं होतं . या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्था कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने काल रात्रीपासूनच पाउले उचलण्यास सुरुवात केली.
कल्याण डोंबिवली मध्ये ५० हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिस यंत्रणेकडून नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. यामध्ये मनसे आमदारांना देखील नोटीस पाठवण्यात आली होती. मनसेच्या २९ कार्यकर्ते पदाधिकार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
काल रात्री पासूनच मजीद मंदिर परिसरात पोलिसांची गस्त सुरू होती. शहरात काही अनुचित प्रकार घडू नये या साठी मशीद मंदिराबाहेर पोलिसांचा पहारा दिसून आला. शांतता कायम ठेवण्यासाठी पोलीसनी माशिसिसमोर, अतिसंवेदनशील आणि महत्वाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यात २६ पोलीस निरीक्षक, १५० पीएसआय – एपीआय – कॉन्स्टेबल, ५० होमगार्ड आणि आरपीएफच्या २ तुकड्या मागवण्यात आल्या असल्याची माहिती कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपयुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले.
याच बरोबर पोलिसांनी मशिदीमधील राष्ट्रीय सोबत चर्चा करून आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील केलं होतं. आज कल्याण परिसरातील मशिदींमध्ये पहाटेच्या सुमारास अजान भोंग्या विना झाली. अजानसाठी लाऊडस्पीकर लावण्यात आले नव्हते. तर दिवसभरातील इतर अजान ह्या कमी आवाजात देण्यात आल्या.
पोलीस यंत्रणेने शहरात कायदा सुव्यवस्था राखावी तसेच शांततेचे आवाहन पोलिस यंत्रणेकडून नागरिक तसेच मनसे कार्यकर्त्यांना करण्यात आले.
0 Comments