मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने बिझनेस ग्रोथ प्लान कॉम्पिटीशन


कल्याण : मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या उद्योजक विकास प्रशिक्षण उपक्रमा अंतर्गत माजातील बेरोजगार युवक-युवतीना उदयोजक विकास प्रशिक्षण देण्यात येते. या उपक्रमातील नव- उदयोजिक युवा-युवतींसाठी दे आसरा, देशपांडे फाउंडेशन आणि लाईट बॉक्स यांच्या सहकार्यांना बिझिनेस ग्रोथ प्लान कॉम्पिटीशन भरविण्यात आली होती. यात जयपूर म्हैसूर, महाराष्ट्र येथुन २६ नव उद्योजकांनी भाग घेतला होताविजयी उद्योजकांना रोख रक्कमेचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात मॅजिक बसचे सीईओ जयंत रस्तोगी यांच्याहस्ते झाली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रविणा कुकडे यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन भीमराज पवार व संतोष शेळवले यांनी केले. या कार्यक्रमात महात्मा फुले विकास महामंडळाचे अनिल सानप तसेच आय.डी.बी.आय, बँकेचे नेजर रंजन आहिरे यांनी  देखील आपला सहभाग  नोंदवला व नव उद्योजकांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments