डोंबिवलीच्या बावन चाळीतील कचऱ्याला आग

 


डोंबिवली  ( शंकर जाधव )  डोंबिवली पश्चिमेतील बावनचाळ म्हणजे नशेडींचा अड्डा बनल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. यापूर्वी विष्णूनगर पोलिसांनी लागोपाठ पंधरा दिवसांत दोनदा कारवाया करून गांज्या हस्तगत करत काही बदमाश्यांना गजाआड केले होते. या घटना ताज्या असतानाच शनिवारी संध्याकाळच्या सुमारास याच बावनचाळीच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याला आग लागली. बहुदा अशा आगी नशेखोरांकडून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
    

 या भागातील मैदानासह रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा कचरा आणून टाकण्यात येत असल्याने परिसराला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी मैदानातील कचऱ्याला आग लागल्याने दोन झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. याचीच पुनरावृत्ती शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. तेथील रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याला आग लागली. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि काही वेळातच या आगीवर नियंत्रण मिळवले. 

Post a Comment

0 Comments