एमजी अॅस्टरच्या ग्राहकांनी सांगितला कार खरेदीचा अनुभव


मुंबई, २ मे २०२२: एमजी मोटरने नुकतेच लाँच केलेली एमजी अॅस्टर या भारताच्या पहिल्या वैयक्तिक एआय असिस्टण्ट व विभागातील प्रथम ऑटोनॉमस (लेव्हल २) तंत्रज्ञानाने सुसज्ज मध्यम आकाराच्या प्रि‍मिअम एसयूव्हीने उद्योगाला परिभाषित करणारी अत्याधुनिक वैशिष्ट्ये व डिझाइनसह ग्राहकांना आनंदित केले आहे.  एमजीने स्टाइल, सुपर, स्मार्ट आणि टॉप-ऑफ-दि-लाइन शार्प अशा व्हेरिएण्ट्समधून निवड केलेल्या कारच्या मालकांना प्रभावित केले आहे. या सर्व व्हेरिएण्ट्सचे ग्राहक तंत्रज्ञान-केंद्रित इंडस्ट्री-फर्स्ट वैशिष्ट्यांचा अनुभव घेत आहेत.


तंत्रज्ञान-संपन्न वैशिष्ट्ये, कारचे व्यावहारिक उपयोजन आणि आनंददायी ह्युमन-मशिन इंटरफेसचे कौतुक करत अॅस्टर खरेदीदार सुनिल येनोरकर म्‍हणाले, "माझ्या नियोजित रोड-ट्रिपपूर्वीच अॅस्टर डिलिव्हर करण्यासाठी आभार. मी अनेक वेळा फॉलो-अप्स घेतले आणि प्रत्येकवेळी एमजी नागपूरने संयमाने व शांतपणे उत्तर दिले. माझ्या डिलिव्हरी विनंतीला प्राधान्य देण्यासाठी विशेषकरून हिमांशू (आरएम), किशोर शिंदे (सेल्स मॅनेजर), अंकिता, कुणाल व संपूर्ण एमजी नागपूर टीमचे आभार."


संतोष यादव भावूक होत म्हणाले, "मी एमजीच्या संपूर्ण सपोर्ट स्टाफचे, विशेषत: श्री. मनिष मायर व श्री. संदीप यांचे कौतुक करतो. त्‍यांनी ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुलभ केली. आता मी एमजी अॅस्टरचा अभिमानी मालक आहे."


“मी माझ्या मुलीच्या विनंतीवरून एमजी शोरूमला भेट दिली. माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता. त्यांनी ज्या प्रकारे स्वत:ला अत्यंत कुशलतेने सादर केले ते पाहून मी अचंबित झालो. फक्त शोरूमचे वातावरणच नाही, तर एमजीच्या सर्व मॉडेल्सनी मला एक वेगळा अनुभव दिला - मला त्यांच्याबद्दल, त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि त्यांच्यातील फरकांबद्दल माहिती देण्यात आली, जेणेकरून मी एक योग्यनिवड करू शकेन. घरी दिलेला टेस्ट ड्राइव्हचा अनुभव अतिशय आरामदायक होता आणि गाडी चालवताना प्रीमियम लक्झरीचा आनंद मिळाला,"असे एमजी इंदौरमधून अॅस्टर खरेदी केलेले श्री. अखिलेश कुमरावत म्हणाले.


एमजी अॅस्टर प्रमाणित ३-३-३ पॅकेजसह येते, ज्यामध्ये तीन वर्षे/अमर्यादित किलोमीटर्सची वॉरंटी तीन वर्षे रोडसाइड असिस्टण्स आणि तीन लेबर-फ्री नियतकालिक सेवांचा समावेश आहे. अद्वितीय माय एमजी शील्ड प्रोग्रामसह अॅस्टर ग्राहकांना निवड करण्याची आणि वॉरंटी एक्स्टेन्शन व प्रोटेक्ट प्लससह त्यांच्या मालकीहक्क पॅकेजचे वैयक्तिकरण करण्याची सुविधा देखील आहे. 


अॅस्टरचा मालकीहक्क खर्च प्रति किलोमीटर फक्त ४७ पैसे असून जवळपास एक लाख किलोमीटरपर्यंत गणन करण्यात आले आहे. अॅस्टर विभागातील प्रथम ३-६० प्रोग्राम या खात्रीदायी बायबॅक प्लानसह देखील येते, ज्याअंतर्गत ग्राहकांना खरेदीला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर अॅस्टरच्या एक्स-शोरूम किंमतीच्या ६० टक्के रक्कम मिळेल. या प्रोग्रामच्या अंमलबजावणीसाठी एमजी इंडियाने कारदेखोसोबत सहयोग केला आहे आणि अॅस्टर ग्राहक याचा वेगळा लाभ घेऊ शकतात.


एमजीच्या इमोशनल डायनॅमिझमच्या जागतिक डिझाइन तत्त्वानुसार स्टाइल करण्यात आलेल्या अॅस्टरचा लुक समकालीन आहे,जो ग्राहकांचे लक्ष वेधून घेतो. अॅस्टरच्या आय-स्मार्ट तंत्रज्ञानामध्ये स्मार्ट व शार्प व्हेरिएण्ट्ससाठी ८० हून अधिक कनेक्‍टेड कार वैशिष्ट्ये आहेत. एडीएएससह ऑटोनॉमस लेव्हल २ वैशिष्ट्ये देखील २२० टूर्बो एटीमध्ये, तसेच शार्प व्हेरिएण्टसाठी व्हीटीआय-टेक सीव्हीटी ट्रान्समिशनमध्ये ऑप्शनल पॅक म्हणून उपलब्ध असतील.

Post a Comment

0 Comments