टिटवाळा रेल्वे स्थानकात वृद्ध दाम्पत्यांचे ७ तोळे सोन्याचे दागिने लंपास चोरटा गजाआड


डोंबिवली ( शंकर जाधव ) टिटवाळा रेल्वे स्थानकात एका वृद्ध दाम्पत्यांचे ७ तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांना बेड्या ठोकून गजाआड करण्यास यश आले आहे.पोलिसांनी अटक आरोपीकडून गुन्ह्यातील ७ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.

    


पोलिसां कडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश बबन घोडविंदे ( ३५, रा. वाशिंद (पुर्व) ) असे आरोपीचे नाव आहे.  सत्यभागा डावरे व पती भगवंत डावरे यांच्या फिर्यादीवरून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हादाखल करण्यात आला. डावरे हे वृद्ध दाम्पत्य १९ एप्रिल रोजी नाशिक येथे नातेवाईकांच्या घरी लग्नासाठी जाणार होते. पहाटे सहा वाजता डावरे हे टिटवाळा रेल्वे स्टेशन येथील फलाट क्र.१ आले असता त्यांनी फलाटावरील  कठड्यावर पर्स व बॅगा ठेवल्या.चोरटा राजेश याची नजर पर्स व बॅगावर होती.संधीचा फायदा घेत राजेशने पर्स व बॅगा लंपास केली. काही वेळाने डावरे यांनी कठड्यावर पर्स व बॅगा दिसत नसल्याने आजूबाजूला शोधली.आपली पर्स व बॅगा चोरला गेल्याची खात्री झाल्यावर डावरे यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली.पोलीस ठाण्यात डावरे यांची फिर्याद नोंदवल्यास तपास सुरु केला. रेल्वे पोलिसांनी टिटवाळा रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले. यात संशियीत इसमाचा हालचाली कैद झाल्या होत्या.मात्र सीसीटीव्ही कॅमेरात चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने,पोलिसांनी खडवलीपडघाखर्डीउमरमाळीवाशिंद,नाहुर या रेल्वे स्टेशनवरील व शहर हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासले.यात चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांनी तपास सुरु केला.६ मे रोजी चोरटा राजेश हा वाशिंद रेल्वे स्टेशनजवळ पश्चिम बाजुस येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.रेल्वे पोलिसांनी वाशिंद रेल्वे स्टेशनजवळ सापाला रचला.वाशिंद रेल्वे स्टेशनजवळ आल्यावर राजेशला संशय आल्यावर पळण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अटक केली.अटक केलेल्या राजेशकडून  गुन्ह्यातील चोरलेलेसोन्याचे मंगळसुत्र, सोन्याचा पोहेहार व सोन्याची अंगठी असा एकुण 3,50,000/-किंमतीचे तोळे सोन्याचे दागीने पोलिसांनी हस्तगत केले.

Post a Comment

0 Comments