डॉ. बाबासाहेबांनी मांडलेल्या विजेच्या मुद्द्यावरच मुंबई महाराष्ट्रात प्रा. हरी नरके यांचे प्रतिपादन; महावितरणमध्ये महापुरुषांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

■कल्याण परिमंडल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सवात मार्गदर्शन करताना ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके. समवेत कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे, मुख्य अभियंता धनंजय औंढेकर.  


कल्याण: ०५ मे २०२२ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईला मिळणारी वीज व पाणी महाराष्ट्राची आहे, हे संबंधित समितीला अभ्यासपूर्वकपणे पटवून दिले. त्यामुळेच मुंबई शहर हे महाराष्ट्रात राहू शकले. यात विजेचा मुद्दा महत्वाचा ठरला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केले.


महावितरणच्या कल्याण परिमंडलाच्या प्रांगणात गुरुवारी सायंकाळी आयोजित महापुरुषांच्या संयुक्त जंयती उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. महावितरणच्या कोकण प्रादेशिक‍ विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे (भाप्रसे) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर तर प्रमुख संयोजक म्हणून कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 


प्रा. नरके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह थोर समाजसुधारकांच्या कार्याचा पट सविस्तरपणे उलगडला. ते म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केंद्रीय उर्जामंत्री म्हणून काम करताना विजेच्या प्रश्नावर पुढील पन्नास वर्षांचा विचार करून त्यांनी नियोजन केले. त्यामुळेच आज देशभरात विजेच्या क्षेत्राची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.


अध्यक्षीय भाषणात सहव्यवस्थापकीय संचालक डांगे यांनी सर्व महापुरुषांची एकत्रित व भव्य जयंती साजरी करण्याच्या कल्याण परिमंडलाच्या उपक्रमाचे कौतूक करत यात सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. तर प्रास्ताविकात मुख्य अभियंता औंढेकर यांनी संयुक्त जयंती साजरी करण्यामागची भूमिका विषद केली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. धनंजय औंढेकर यांनी केले, कोकण प्रादेशिक विभागातील वित्त व लेखा विभागाचे महाव्यवस्थापक श्री. अनिल बऱ्हाटे, मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक (प्र) श्री. सुनिल पाठक, अधीक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, किशोर ऊके, विजय मोरे, राजेशसिंग चव्हाण, किरण नागावकर, कार्यकारी व उपकार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अभियंता (प्रशासन) अनिल महाजन, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशिल गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांच्यासह समिती सदस्य, कामगार संघटनांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर राऊत यांनी केले. तर अधीक्षक अभियंता भोळे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments