डोंबिवली येथील ९० फुटी रस्त्यावर बहरला बाल गोपाळांचा मेळा


कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार कल्याण मधील रिंग रोडवरील गांधारे ब्रिज ते बारावे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डोंबिवली येथील पत्री पुल ते ठाकुर्ली, ९० फुटी रेल्वे समांतर रस्ता, या दोन रस्त्यांवरील एका बाजूची मार्गिका ७ मे  रोजी सायकलिंग आणि चालण्या करीता सकाळच्या प्रहरी (सकाळी ५ ते ८ वा.) खुली करण्यात आली आणि ही मार्गिका प्रभात फेरीला जाणा-या , सायकलिंग करणा-या आबाल वृध्दांनी फुलू लागल्या. 


अनेक महिलांनी देखील या मार्गिकेवरुन सकाळच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी पसंती दर्शविली आहे. इतकेच नव्हे तर लहान मुले-मुली देखील सकाळच्या वेळेस सदर मार्गिकांवरुन आनंदाने सायकलिंग करतांना दिसून येत आहेत.


मनपा परिसरात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी राबवित असलेल्या अनेकविध उपक्रमांबरोबरच नागरिकांचे आरोग्य , शारिरिक स्वास्थ‍ निरोगी रहावे, भावी पिढीतील म्हणजेच लहान मुलांमधील शारिरिक क्षमतेचा विकास व्हावा यादृष्टीकोनातून आयुक्तांनी राबविलेली *माय सिटी फिट सिटी* ही संकल्पना आता प्रत्यक्षात साकार होतांना दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments