भररस्त्यात चोरट्याला नागरिकांनी दिला चोप कोपर रोडवरील घटनाडोंबिवली ( शंकर जाधव ) सोन्याची चैन खेचून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोनसाखळी चोरट्याला स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून चांगलाच चोप दिला. नागरिकांनी चोरट्याला विष्णूनगर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांनी फिर्याद दाखल करून अटक केली.जागरूक नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल पोलिसांनी  नागरिकांचे आभार मानले.ही घटना १२ मे रोजी कोपर रोड येथे घडली. 

 

पोलीसांसकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय पांडुरंग धोत्रे ( २२, रूम नं. १०२, सिंघानिया बिल्डींगसखाराम कॉम्प्लेक्सडोंबिवली पश्चिम पुर्वी रा.साठे नगरझोपडपटटी, चर्चच्या बाजूलारोड नं.२१वागळे इस्टेटठाणे ) असे अटक आरोपीचे नाव आहे.१२ मे रोजी डोंबिवली पश्चिमेकडील कोपर रोडवर फिर्यादी विनोद मांगीलाल शर्मा हे पायी चालत असताना अचानक समोरून अक्षय आला.


शर्मा यांना काही समजण्याच्या आताच अक्षयने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचून पळण्याचा प्रयत्न केला.शर्मा यांनी आरडा-ओरड केल्यावर स्थानिक नागरिकांनी अक्षयचा पाठलाग केला.पुढे काही अंतरावर नागरिकांनी अक्षयला पकडून चांग्लाच चोप दिला.चोरट्याला पकडून नागरिकांनी विष्णूनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी अक्षयची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे चोरलेली सोन्याची चैन आणि यापूर्वी चोरलेला मोबाईल फोन सापडला.


अटक आरोपीविरोधात यापुर्वी ठाणे येथील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात येथे  भादंवि. कलम ३०७,१४१,१४३,१४५,१४७,१४८ भाहका.कलम ४,२५२) ०३/२०२२भादंवि कलम३८०,३४ प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची माहिती विष्णूनगर पोलिसांना मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments