मराठी भारती संघटनेच्या वतीने असंघटित कामगारांची नोंदणी असंघटित कामगारांना केले ई श्रम कार्डचे मोफत वाटप


कल्याण : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून मराठी भारती संघटनेने हाती घेतलेल्या मोफत ई श्रम कार्ड या मोहिमेअंतर्गत जागतिक कामगार दिनी अनेक असंघटित कामगारांना मोफत कार्ड वाटप करण्यात आले. ज्यांच्या मेहनतीवरश्रमावर हा देश उभा आहे त्यांच्यासाठी येत्या काळात अनेक योजना सरकारने राबविल्या पाहिजेत यासाठी संघटना कायम प्रयत्नशील राहील असे आश्वासन संघटनेच्या अध्यक्षा ऍड पूजा बडेकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात दिले. 


 

या कार्यक्रमात ५०० ते ६०० लोकांचा सहभाग असून कार्यक्रमाची सुरुवात ही कामगारांचे खेळ घेऊन करण्यात आली. कायम १० ते १२ तास सतत श्रम करून त्यांचे जगणे हरवू नये आणि त्यांनी देखील त्यांच्या आयुष्यात थोडेसे मोकळे जगले पाहिजे यासाठी संघटनेचे संघटक राकेश सुतार,  आशिष गायकवाड यांनी कामगारांचे खेळ घेतल्याची माहिती संघटनेच्या कार्याध्यक्षा विजेता भोनकर यांनी दिली. 


 

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. आशिष भोसले यांनी कामगारांना मार्गदर्शन करत असताना विशेषतः महिला कामगारांच्या लक्षणीय उपस्थितीचे कौतुक केले. आज लोकशाही जपण्याची गरज असून त्यासाठी सर्वच स्तरातील लोकांनी सहभाग घेतला पाहिजे असे त्यांनी म्हटले. सर्वच कामगारांनी त्यांच्या न्याय हक्कांसाठी आपण लढले पाहिजेत्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे वक्तव्य संघटनेचे कार्यवाह अनिल हाटे यांनी केले.

Post a Comment

0 Comments