पेटीएम पेमेंट्स सर्विसेसच्या महसूला मध्ये वार्षिक ८० टक्क्यांनी वाढ आर्थिक सेवा महसूला मध्ये वार्षिक ३४२ टक्क्यांची वाढ ~


मुंबई, २३ मे २०२२ : भारतातील आघाडीची मोबाइल पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी ब्रॅण्ड पेटीएमची मालकीहक्क असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने (ओसीएल) घोषणा केली आहे की, कंपनी सप्टेंबर २०२३ रोजी संपणा-या तिमाहीपर्यंत त्यांचे नफा लक्ष्य संपादित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. कंपनीने पेमेंट व आर्थिक सेवांच्या माध्यमातून आर्थिक वर्ष २०२२ मध्ये महसूलामध्ये ७७ टक्क्यांच्या प्रबळ वाढीसह ४,९७४ कोटी रूपयांपर्यंत वाढ केली आहे आणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये योगदान नफा वार्षिक ४ पट वाढीसह १,४९८ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले आहे.


पेटीएमच्या पेमेंट सर्विसेसचा (व्यापारी व ग्राहकांना ऑफर करण्यात आलेल्या) महसूल आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत वार्षिक ८० टक्क्यांसह झपाट्याने वाढला. याचे अधिकतम श्रेय पेटीएम अॅपवरील युजर सहभाग व युज केसेसच्या स्थिर विकासाला, तसेच एमडीआर महसूलामध्ये लक्षणीय वाढ आणि डिवाईस सबस्क्रिप्शन्समधील वाढीला जाते. आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत पेटीएमच्या युजरचा सहभाग वार्षिक ४१ टक्क्यांच्या वाढीसह ७०.९ दशलक्षपर्यंतचा पोहोचला, तर त्यांचे व्यापारीवर्ग जवळपास २६.७ दशलक्षापर्यंत पोहोचले.


कंपनी देशभरात ३ दशलक्षहून अधिक डिवाईसेसच्या उपयोजनांसह त्यांची ऑफलाइन पेमेंट लीडरशीप प्रबळ करत आहे, ज्यामुळे व्यापा-यांना कर्जसुविधा देण्याच्या प्रमाणाला देखील चालना मिळत आहे. उपयोजनामध्ये असलेल्या पेटीएम डिवाईसच्या माध्यमातून ७५ टक्क्यांहून अधिक व्यापा-यांना कर्ज देण्यात आले.


पेटीएमने सांगितले की, "युजर सहभागामधील झेपने पेटीएम व्यासपीठावरील पेमेंट साधने व ग्राहक वापराकडे न पाहता कंपनीच्या उत्पन्न संधींत वाढ करण्यामध्ये भूमिका बजावली आहे. व्यापारी पेमेंट सोल्यूशन्सच्या संपूर्ण श्रेणीमध्ये वाढ होताना दिसत आहेत, या श्रेणी आहेत: (१) पेमेंट्ससाठी क्यूआर (विशिष्टत: मोफत), (२) साऊंडबॉक्सेस (जे सबस्क्रिप्शन महसूलाची निर्मिती करतात), (३) कार्ड मशिन्स (जे सबस्क्रिप्शन व एमडीआर महसूल निर्माण करतात), आणि (४) ऑनलाइन व्यापा-यांसाठी पेमेंट गेटवे (जे एमडीआर महसूल व व्यासपीठ शुल्कांची निर्मिती करते). यामधून पेटीएमने निर्माण केलेली प्रबळ परिसंस्था व व्यवसाय मॉडेल दिसून येते."


आर्थिक सेवांमधून निर्माण झालेल्या महसूलामध्ये पेटीएमच्या कर्जसुविधा व्यवसायामधील प्रबळ वाढीमुळे आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत वार्षिक ३४२ टक्क्यांची वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये पेटीएम व्यासपीठाच्या माध्यमातून कर्ज आर्थिक वर्ष २०२१ मधील २.६ दशलक्षवून १५.२ दशलक्ष वितरणापर्यंत वाढले, ज्यामधून वार्षिक ४७८ टक्क्यांची वाढ दिसून आली. मूल्यसंदर्भात आर्थिक वर्ष २०२२ मध्ये वितरण करण्यात आलेले एकूण कर्ज मूल्य ७,६२३ कोटी रूपये होते, ज्यामध्ये आर्थिक वर्ष २०२१ मधील १,४०९ कोटी रूपयांच्या तुलनेत ४४१ टक्के वाढ झाली. एप्रिल २०२२ मध्ये कर्जसुविधा व्यवसायामध्ये अधिक वाढ झाली, जेथे वार्षिक वितरण रन-रेट २०,००० कोटी रूपयांपर्यंत पोहोचले.


कंपनीने युजर वाढ, व्यापारी डिवाईस उपयोजन आणि तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करत राहण्यासोबत आपला ईबीआयटीडीए (ईएसओपी खर्चाअगोदर) नुकसान सुधारणे सुरूच ठेवले आहे. व्यवसायामधील कार्यसंचालन नफ्यामधील वाढीमुळे कंपनीला सप्टेंबर २०२३ तिमाहीपर्यंत ईबीआयटीडीए (ईएसओपी वगळून) नफा संपादित करण्याच्या ध्येयाप्रती ईबीआयटीडीए नुकसानांमध्ये झपाट्याने घट होण्याची अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments