डोंबिवलीच्या लीला ताईंची ही एकावेळी ३२ पुस्तकं पुनःप्रकाशित करून विक्रम


डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील ८७ वर्षीय आजी लीला शहा यांनी   २ नवीन कथा संग्रहाचं प्रकाशन (शिंपल्यातले मोतीअंतहीन अंधार यात्रा) आणि ३२ पुस्तकांचं (यांत ६ छोट्या पुस्तकांचे मिळून एक पुस्तक.) पुनःप्रकाशन एकाच वेळी करण्याचा विक्रम केला आहे.या आगोदरचा विक्रम २५ पुस्तकांचा पुनःप्रकाशित सोलापूरच्या सुरेखा शहा यांचा आहे.

  

लीला शहा यांनी वयाच्या १६ व्या वर्षी आपल्या लेखनाचा श्रीगणेशा केला. १९५२ साली लोकसत्तेत 'लगीन घाईही त्यांची पहिली कविता छापून आलीआणि त्यांच्या लेखन प्रवासाला गती मिळाली. 'गीत ज्ञानेश्वरहे त्यांचं पहिलं पुस्तक १९८४ साली प्रकाशित झालं. त्यानंतर मग बालकांपासून ज्येष्ठांपर्यंतविविध विषयांवरील अशी ६८ पुस्तकं आजवर त्यांनी लिहिली. 



लीलाताईंच्या मातोश्री रतनबाई शिवलाल शहा ह्या संपूर्ण भारतातजैन समाजातील पहिल्या कीर्तनकारम्हणून ओळखल्या जातात.पणजोबाआजोबाआई हे कीर्तनकार व कवीपूर्वापार चालत आलेली ही साहित्यसेवेची परंपरा लीलाताईंनी पुढे सुरु ठेवली आहे. त्यांनी स्वतः २०० गाणीसुद्धा लिहिली. 'गीत बाहुबलीगीत महावीरगीत ज्ञानेश्वरअशा गीतांनाविविध रागात व चालीत बांधून व गाऊन त्याचे असंख्य कार्यक्रमही लीलाताईंनी केले.



लीलाताईंना आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या ३ पुरस्कारांसह८५ विविध पुरस्कार मिळालेत.२०१७ ला अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाचे मानाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते वाईच्या महावीर बुक एजन्सीचे  राकेश शहा  यांनी लीलाताईंच्या ही ३२ पुस्तकं पुनःप्रकाशित केले.हे त्यांचे आडनावबंधू आहेत.



एकाच वेळी ३२ पुस्तकं पुनःप्रकाशित होण्याचा हा विक्रम लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्सला  पाठवला जाणर आहे. या वर्षाअखेरीस लीलाताईंची ९ नवीन पुस्तके वाचकांच्या भेटीला येत आहेत.

Post a Comment

0 Comments