डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोळवली येथील जनसंपर्क कार्यालयात बहुजन समाज पार्टीचे डोंबिवली विधानसभा अध्यक्ष संतोष वाढवे, महासचिव देवानंद खडसे, सचिव प्रमोद वाढवे, तसेच शिवसेनेचे रविनगर ४९ चे उपशाखाप्रमुख अजय चंदन यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश केला.
आगामी काळात डोंबिवली विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोमाने वाटचाल करेल असा विश्वास सुधीर पाटील यांनी व्यक्त केला. याप्रसंगी डोंबिवली युवक अध्यक्ष प्रसाद गायकवाड, कल्याण पूर्व अध्यक्ष विश्वास आव्हाड, जिल्हा सचिव वैभव मोरे, डोंबिवली विधानसभा उपाध्यक्ष चंद्रकांत भिसे, योगेश काळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments