मैत्रकुलच्या संकल्प मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद"बापगाव येथे स्वतःची जागा घेण्यासाठी मदत करण्याचे मैत्रकुल संस्थापक किशोर जगताप यांचे आवाहनकल्याण : उडतां कल्याण होवू नये व किमान एक मुलगा तरी व्यसनाधीन होवू नये या करता किशोर गणाई व मैत्रकुल मी अट्टाहासाने कल्याण मध्ये अक्षरशः खेचुन आणले व आज आनंद वाटतो मैत्रकुलने कल्याण मधील काही मुलांचे जगणं तर बदललं पण कल्याणच्या नावाचा करिश्मा वाढवायला मैत्रकुलची मदत झाली असे मत आपल्या उद्घाटनपर भाषणात माजी नगरसेवक व कल्याण विकासिनीचे अध्यक्ष उदय रसाळ यांनी मांडले. मैत्रकुलच्या हक्काच्या जागेसाठी पुन्हा एकदा पायाला भिंगरी लावेन असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला असल्याची  माहिती मैत्रकूल प्रमुख संचालक आशिष गायकवाड यांनी दिली.

 

छात्रशक्ती संचालित मैत्रकुल या आधुनिक गुरुकुलास पाच वर्ष झाल्या निमीत्त बापगाव ,कल्याण-भिवंडी येथे "संकल्प मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले त्यास अनेक मैत्रकुल प्रेमींनी हजेरी लावली होती. त्यावेळी संस्थापक किशोर जगताप यांनी या वर्षात स्वतःच्या हक्काच्या जागेत जाण्याचा संकल्प जाहिर करताच मैत्रकुल प्रेमींनी त्यास जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला व अनेकांनी मैत्रकुलदुत म्हणून निधी उभा करण्यासाठी तन मन धनाने काम करण्याचे आश्वासन दिले.पाच हजार लोकांनी एकदाच दोन हजार रुपये दिल्यास एक कोटी रुपये उभे राहतील व स्वतःची जागा घेण्यासोबत बांधकामही आपण एका वर्षात उभे करू. किशोर गणाई यांचा हा विश्वास आपण प्रत्यक्षात आणू ही खात्री अनेकांनी या निमीत्त आपल्या भाषणात दिली. आजवर मी फक्त धार्मिक ठिकाणीच मदत करत होतो पण आजपासून सदैव पॉजिटीव एनर्जी देणाऱ्या मैत्रकुलला मी प्रायोरीटीने  मदत देणार असे सांगून मैत्रकुलसाठी पन्नास हजारांची देणगी उद्योजक संतोष जाधव यांनी जाहीर केले .       प्रबोधनात्मक गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली व पुढे मैत्रकूल च्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य मैत्रकूल मुळे कसे घडले व बदलले याची ग्वाही दिली तसेच असंख्य हितचिंतकांनी मैत्रकूल बद्दल भरभरून भाष्य केले अशी माहिती कार्यक्रम प्रमुख श्रेया निकाळजे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments