तीन हजार वन्यजीवांना मदत करणाऱ्या निलेश भणगेला 'आयकॉन ऑफ एशिया' पुरस्कार जाहीर


डोंबिवली ( शंकर जाधव ) प्राणी मित्र निलेश भणगे यांना यावर्षीचा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल 'आयकॉन ऑफ एशिया' पुरस्कार' जाहीर झाला आहे.हा पुरस्कार दरवर्षी आशिया खंडातील विशेष कर्तृत्ववान व्यक्तींना  दिला जातो. भारतात  पशुकल्याण मूव्हमेंट सुरू झाली, त्या सुरुवातीच्या काळापासून वयाच्या १८ व्या वर्षी निलेश भणगेने प्राणी कल्याणाचे काम सुरु केले. निलेश गेली २४ वर्षें सामाजिक करत असून १९९८ ला एका कबुतर वाचवण्याने  कामाला सुरुवात केली.


तेव्हापासून ते  २०२२ मध्ये जार मध्ये अडकलेल्या बिबट्याला सोडवण्याच्या या कामाचे नागरिक, प्राणी- पशु प्रेमींनीच नव्हे तर वृत्तपत्रातही कौतुक झाले. निलेशने पॉज संस्थेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील पहिली पशु रुग्णवाहिका सुरू केली.२००५ मध्ये त्यांचा कार्याची दखल घेऊन लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये 'भारतातील सर्वात तरुण प्राणी पुनर्वसन टीम' म्हणून नाव नोंदले आहे. 


२००१ मध्ये निलेश ह्यांनी ठाणे जिल्ह्यात प्लांट अँड अनिमल वेल्फेअर ( पॉज )  संस्थेची स्थापना केली. कल्याण-डोंबिवली ते बदलापूर ह्या परिसरात प्रथमच अशी संस्था कार्यरत केली. ह्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ठाणे जिल्ह्यातील पहिली पशु रुग्णवाहिका सुरू केली. आणि रस्त्यावर पडलेल्या घायाळ आणि आजारी पशु-पक्षी जवळील हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी सोय करून दिली. गेल्या २२ वर्षांत निलेश ह्यांनी नवीन संस्थाना आतापर्यंत ५ रुग्णवाहिका भेट म्हणून दिल्या आहेत. संस्थेकडे सध्या वन्यजीव आणि रस्त्यावरील भटक्या जनावरांना वेगळ्या रुग्णवाहिका कार्यरत आहेत.
       

निलेशना आतापर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष उल्लेख म्हणजे अमेरिकेतील पेटा च्या संस्थापक इनग्रीड न्यूकर्क ह्यांनी २००७ मध्ये 'हिरो टू अनिमल्स' पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. इनरव्हील क्लब तर्फे २०१३ मध्ये 'समाजासाठी उत्कृष्ट सेवा' २०१२ मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन अनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन तर्फे गोव्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर ह्यांच्या उपस्थितीत 'स्वयंसेवक संबंध पुरस्कार' मिळाला आहे.
   

२०१० मध्ये माजी केंद्रीय मंत्री  मनेका गांधी ह्यांनी मुरबाड येथे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे पशु रुग्णालय निलेश ह्यांना चालवायला दिले होते, या रुग्णालयात दरवर्षी हजारो प्राण्यांना मेडिकल केअर आणि जीवनदान दिले जाते. ह्या रुग्णालयात पशुवैद्यक साठी विविध ट्रेनिंग प्रोग्रॅम आयोजित केले जातात.  निलेशने यावर्षी ठाणे जिल्ह्यातील प्रथम 'गॅस अनेस्थेशिया' वरील वर्कशॉप  ठेवले होते ,त्यात २४ पशु वैद्यकीय डॉक्टरांनी  सहभाग घेतला होता. गेली २४ वर्षे निलेश वन्यजीव पुनर्वसनात कार्यरत असून तीन हजारच्या वर वन्यजीवांना मदत करण्यात यश मिळवले. 


 महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील पाळीव हत्तीवर निलेशने रिसर्च केले असुन त्याचे चार रिसर्च रिपोर्ट प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचा ह्या रिपोर्ट मुळे मुंबई ठाणे आणि पुणे येथिल भीक मागण्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या हत्तींवर बंदी घालण्यात आली. निलेश हे स्वतः वन्यजीव फोटोग्राफर असून ते आणि भारतातील प्रख्यात फोटोग्राफर विविध शाळांसाठी मोफत वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन भरवत असतात. सुमारे ३०० छायाचित्रे संग्रही आहेत. निलेशने २००४ साली नॅशनल सर्कस मधून 12 सिंह आणि 2 वाघ मुक्त करून बंगलोरला केन्द्र सरकार च्या पुनर्वसन केंद्रात पाठवले आहे.


 निलेश हे 'स्वयंसेवक व्यवस्थापन' आणि 'मिडिया व्यवस्थापन' ह्या विषयांवर आशियातील प्रमुख कॉन्फरन्समध्ये वर्कशॉप घेत असतात. आतापर्यंत सिंगापूर, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया, नेपाळ आणि हॉंगकॉंग मध्ये विविध वन्यजीव आणि पशुकल्याण कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सादरीकरण केले आहे. त्यांचा ह्या कार्याची दखल अमेरिकन रेडिओ आणि वृत्तपत्रे, ब्रिटन मधील वृत्तपत्रे ह्यांनी देखील घेतली आहे. 


त्याने आतापर्यंत २००० च्या वर स्वयंसेवकांना वन्यजीव आणि पशु कल्याण मध्ये ट्रेनिंग दिले आहे. 'आयकॉन ऑफ एशिया'  पुरस्कार पॉज टीम आणि मित्र परिवार ह्यांचा सहकाराशिवाय शक्य नव्हते आणि त्यांचे आभार मानणे योग्य आहे" असे निलेश भणगेने सांगितले. 

Post a Comment

0 Comments