पावसाळ्यात येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीशी मुकाबला करण्यास पालिका प्रशासन सज्ज, नाले, गटार सफाईची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य ...आयुक्त सुधाकर देशमुख


भिवंडी , प्रतिनिधी  : भिवंडी शहरात दरवर्षी काही सखल भागात पावसाचे पाणी साचून पूरस्थिती निर्माण होते. याकरिता पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शहरातील सर्व नाल्यांचे व गटारांची सफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत.शहरात काही पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर मात करण्यास प्रशासन पूर्ण तयारीनिशी सज्ज असल्याची  माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आपत्कालीन समन्वय समितिच्या बैठकीत दिली. 


पावसाळ्यापूर्वी भिवंडी शहरातील आपत्कालीन परिस्थिती बाबत बैठक घेण्यात आली त्यावेळी आयुक्त बोलत होते, या बैठकीला भिवंडी पोलीस  परिमंडळ 2 चे उपायुक्त योगेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, आपत्कालीन विभाग उपायुक्त दीपक झिंजाड शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड,  पूर्व व पश्चिम विभाग  सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पालिकेचे सर्व प्रभाग अधिकारी, स्टेम, टोरंट, बी.एस एन एल चे अधिकारी उपस्थित होते.


आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नमूद केले की, शहरातील अतिधोकादायक इमारतींची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार अतीधोकादायक इमारतींवर नियमानुसार निष्कासित करण्याचे काम करावे. डोंगरावर, टेकडीवर असणाऱ्या मालमत्तांवर धोक्याच्या सूचना लावण्यात याव्यात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. अतिधोकादायक इमारती यांना नोटिसा देऊन त्यांचे पाणी व वीज कनेक्शन खंडित करावे , v अशा इमारती रिकाम्या करून घ्याव्यात,जेणेकरून पावसाळ्याच्या दरम्यान कोणतीही दुर्घटना होणार नाही. 


31 मे पूर्वी सर्व  मोठे, छोटे नाले व गटारे साफ  होतील याची दक्षता घ्यावी. तसेच शहरात पूरस्थिती हाताळणीसाठी लागणारी सर्व विभाग विशेष करून अग्निशमन व आपत्कालीन विभाग सज्ज राहतील. धोकादायक झाडाची व फांद्यांची छाटणी करण्यात यावी. पूर् परिस्थितीत नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या जागा निश्चित कराव्यात त्या ठिकाणी नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी, जेवणाची पाकिटे इत्यादी व्यवस्था करण्यात यावी. वैद्यकीय आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा याबाबत खातरजमा करावी. पावसाळ्यात साथीचे रोग येतात त्या दृष्टीने सर्व औषधाची तयारी ठेवावी. 


इंदिरा गांधी  शासकीय रुग्णालयात कुत्रा, साप चावणे यावरील औषध तयार आहेत की नाही याची देखील खातरजमा करून इंदिरा गांधी रुग्णालय औषध खरेदी करून ठेवावी अशा सूचना देखील आयुक्त यांनी दिल्या आहेत. पावसाळ्यातील पूरस्थिती निर्माण झाल्यास सर्व यंत्रणा एकमेकांच्या सहकार्याने कार्यरत राहतील,संपर्काची माध्यम चांगल्याप्रकारे कार्यरत राहतील याची देखील दक्षता घेण्याचे सूचना आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिल्या. 


पालिका प्रशासन पोलीस प्रशासन व अन्य सर्व विभागाचे प्रमुख यांनी एकमेकांच्या संपर्कात राहून पुरपरिस्थितीवर मात करण्याकामी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी निश्चित करून एकमेकांच्या संपर्कात राहून यावर मात करावयाची आहे. पुर परिस्थितीवर मात करण्यासाठी पालिका प्रशासन पूर्ण तयार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली. 


तर पोलीस उपायुक्त यागेश चव्हाण यांनी देखील सांगितले की, पावसाळ्यात ट्रान्सफर्मेर व पाण्यात शॉक लागणे त्यामुळे दुर्घटना होतात त्याची काळजी घेणं, पूर परिस्थिती लागणरी साधने बोटी, दोरी, बोटी  चालवणारे, पोहणारे जवान याची यादी  तयार करणे, तसेच   अतीधोकादायक इमारती रिकाम्या करणे तसेच अत्यावश्यक ठिकाणी  पोलीस विभागाचे सहकार्य घ्यावे आवाहन पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी केले.

Post a Comment

0 Comments