वाढीव अतिरिक्त सुरक्षा ठेव का घेता ? राष्ट्रवादीने विचारला जाब


डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने कल्याण परिमंडळ वीज वितरण विभागाचे मुख्य अभियंता  धनंजय आउंधेकर यांची भेट घेतली. वीज महावितरण विभागाकडून नागरिकांना  वीज मिटरचे वाढीव अतिरिक्त सुरक्षा ठेव आणि वाढीव वीज बिल दिल्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. 


सामान्य नागरिकांचे प्रश्न मुख्य अभियंता आउंधेकर यांनी ऐकून घेतले.त्यावर महावितरण विभागाकडून योग्य पाऊल उचलले जातील असे आश्वासन मुख्य अभियंता यांनी शिष्टमंडळाला दिले.


 या शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सचिव व प्रदेश प्रतिनिधी  नोवेल साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वल्ली राजन,  योगेश माळी, सुजित रोकडे,  भावेश सोनावणे, संतोष रोकडे,महबूब शेख,  प्रविण गुंजाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments