राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी प्रसाद महाजन

 


कल्याण : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी कल्याण मधील प्रसाद महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर प्रसाद महाजन यांची  नियुक्ती करण्यात आली असून यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या उपस्थितीत युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते महाजन यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.


शरदपवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भरीव कार्य करत  पक्ष संघटना मजबुतीने उभी करण्यासाठी संपूर्ण ताकदीने समाजकार्य करणार असल्याचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रसाद महाजन यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीनंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments