कल्याण पूर्वेतील छ.शाहू उद्यानाची दुरावस्था


कल्याण : कोळसेवाडी कल्याण पूर्वेतील पालिकेचे एकमेव असलेले छ.शाहू  उद्यानाची दुरावस्था झाली आहे. येथे असलेली खेळणी तुटलेल्या अवस्थेत असल्याने येथे येणाऱ्या चिमुकल्यांचा हिरमोड होत आहे.


 "आम्ही नियमित कर देत असतो पण पालिका आमच्या मुलांना पाहिजे  असलेल्या साध्या सुविधा पुरवू शकत नाही का ?" असा सवाल येथील नागरिकांनी केला असून कल्याण पूर्वेतील एकही उद्यान लहान मुलांना खेळण्यासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उद्यान विभागाने बनवले नाही. कल्याण पश्चिम आणि डोंबिवली मधील लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या तुलनेत कल्याण पूर्वचे लहान मुले मागे पडतात.


याला जबाबदार पालिका प्रशासन आणि चांगले रस्ते खोदून काँक्रिट रस्तावर पैसे उडवणारे अधिकारीनेतेच जबाबदार असून पालिका आयुक्तांनी त्वरीत दखल घेवून उद्यानातील खेळणी दुरुस्तीचे आदेश द्यावेत, लहान मुलांना आकर्षित करेल अशी चांगली रंग रागोटी करण्याची मागणी कल्याण विकासनीचे अध्यक्ष उदय रसाळ यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments