शिक्षक पतसंस्था निवडणुकीत विद्या सेवक पॅनेलचे उमेदवार विजयी


कल्याण : ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढी शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत भाजप शिक्षक आघाडीचा धुव्वा उडवून महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना आणि शिक्षक सेनेच्या विद्यासेवक पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. या पॅनेलचे सर्वच्या सर्व १५ संचालक पदांचे उमेदवार निवडून आले असून भाजप शिक्षक आघाडी आणि शिक्षक परिषदेच्या उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला आहे.माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काळात ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढीवर शिक्षण क्रांती संघटनेचे वर्चस्व होते. त्याविरोधात एकीकडे शिक्षक परिषद आणि दुसरीकडे भाजप शिक्षक आघाडीने पतपेढीच्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते.


 त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर प्रचारकाळात विद्यमान संचालकांविरोधात प्रचार केला गेला होता. मात्र शिक्षक मतदारांनी त्याला बळी न पडता शिक्षण क्रांतीचे अध्यक्ष सुधीर घागस आणि शिक्षक सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील विद्यासेवक पॅनेलला जिल्ह्यातील शिक्षक मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहेत. त्याचबरोबर शिक्षक सेनेचे ठाणे जिल्हा उपाअध्यक्ष विलास आंग्रेशिक्षक सेनेचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष पंजाबराव बडगे, शिक्षक सेनेचे कल्याण जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील, अटाळी येथील मुख्याध्यापक गजानान पाटील यांचे शिक्षक उमेदवारांच्या पारड्यात यश खेचून आणण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले. 

Post a Comment

0 Comments