संपूर्ण राज्यभर शिवसेनेच्या वतीने "शिवसंपर्क" अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यास मोठ्या उत्साहात सुरुवात - खासदार राजन विचारे


ठाणे, प्रतिनिधी :- आज रायगड, रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोहा व जवळील परिसरात पक्ष संघटनात्मक बांधणी आणि शिवसेना पक्षाचे बळकटीकरण करण्यासंदर्भात चर्चा करीत मार्गदर्शन केले. कोरोनाचे संकट, अतिवृष्टी पावसामुळे होणारे भूसंखलन व वादळ अशा अनेक संकटांचा सामना करीत सर्व लोकप्रतिनिधींनी दिवस-रात्र काम करून लोकांना मदत केली त्याबद्दल यावेळी कौतुक केले. 


शासनाच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे असे आवाहन खासदार राजन विचारे यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चितच शिवसेनेचा भगवा फडकला शिवाय राहणार नाही अशी भावना यावेळी विचारे यांनी व्यक्त केली.


यावेळी आमदार श्री. महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख श्री. अनीलजी नवघने, जिल्हा सल्लागार श्री.किशोर जैन, महीला आघाडी प्रमुख धनश्री पोटफोडे, युवा सेना जिल्हाधिकारी सुधीर ढाणे, जिल्हा संपर्क प्रमुख विलास चावरी, तालुका प्रमुख श्री. समीर शेडगे, शिवसेनेचे विभाग प्रमुख, उप तालुका प्रमुख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


तसेच आज रायगड, मुरुड येथील "सोमवंशीय क्षत्रिय माळी समाज सभागृह" येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुरुड व जवळील परिसरात पक्ष संघटनात्मक बांधणी आणि शिवसेना पक्षाचे बळकटीकरण करण्यासंदर्भात खासदार राजन विचारे यांनी चर्चा करीत मार्गदर्शन केले.


यावेळी आमदार श्री. महेंद्र दळवी, जिल्हा संपर्क प्रमुख विलास चावरी, उप जिल्हा प्रमुख प्रशांत मिसळ, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते श्री. सुरेंद्र म्हात्रे, विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख बंड्या पाटील, मुरुड तालुका प्रमुख श्री. ऋषिकांत डोंगरे, तालुका संघटीका करडे मॅडम, जिल्हा परिषद सदस्य राजश्री मिसाळ, मुरुड नगराध्यक्ष स्नेहाताई पाटील, मुरुड तालुका संघटक श्री.भगीरथ पाटील, उपतालुका प्रमुख श्री. चंद्रकांत मोहित, शहरप्रमुख श्री. आदेश दांडेकर व अन्य पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.


तसेच अलिबाग येथे राजमाळा - अलिबाग चे आमदार श्री. महेंद्र दळवी यांच्या श्रीराज आमदार निवास येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हाप्रमुख आमदार श्री. महेंद्र दळवी, संपर्कप्रमुख श्री.विलास टावरी, सहसंपर्क प्रमुख श्री. सुरेंद्र म्हात्रे, तालुकाप्रमुख श्री. राजा केणी, कामगार नेते श्री. दिपक रानवडे, विधानसभा संघटक श्री. सतीश पाटील, शहरप्रमुख श्री संदीप पालकर, महिला आघाडी सौ. तनुजा पेरेकर, युवासेना अधिकारी अजय गायकर व आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या अभियान दौऱ्यादरम्यान  रायगड जिल्ह्यातील तालुका पेन येथील बेणसे गावातील ग्रामपंचायतीच्या नवीन_इमारती चे लोकार्पण खासदार राजन विचारे यांच्या हस्ते झाले. यावेळी या लोकार्पण सोहळ्यास बेणसे गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिति होती.


रिलायन्स इंडस्ट्रीज च्या माध्यमातून झालेल्या या ग्रामपंचायत इमारतीसाठी खासदार राजन विचारे यांनी आभार व्यक्त केले. रिलायन्स इंडस्ट्रीज ने स्थनिक तरुणांना रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ही खासदार राजन विचारे यांनी यावेळी बोलताना केली.


यावेळी आमदार श्री. महेंद्र दळवी, मा. आमदार विशाखा राऊत, मुंबई महापालिकेच्या मा. महापौर किशोरीताई पेडणेकर, शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळे, रिलायन्स इंडस्ट्रीजचे वरिष्ठ अधिकारी श्री. अविनाश श्रीखंडे, श्री. शशांक गोयल, सरपंच श्री. मधुकर पारधी, उपसरपंच सौ. सपनाताई पांढरे व आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments