मिलिंद पाटील यांना सुनिर्मल फाउंडेशनचा शिक्षण भूषण गौरव पुरस्कार प्रदान


कल्याण : श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल,  धारावी येथे सुनिर्मल फाऊंडेशनचे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे साहित्यिकपत्रकारसामाजिकशिक्षक यांना सुनिर्मल गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कल्याण पूर्वेतील शिक्षण व सामाजिक कार्य करणारे मिलिंद पाटील यांना सुनिर्मल फाउंडेशनचा शिक्षणभूषण गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मिलिंद पाटील यांचे कार्य हे व्यसनांना आळा घालणे तसेच व्यसनाविरोधात प्रचारप्रसारप्रबोधनव्यक्तीचे मतपरिवर्तन करून त्यांना निर्व्यसनी बनविण्यासाठी युवकांपुढे तसेच समाजापुढे  व्यसनमुक्तीचा संदेश जावा यासाठी पथनाट्य स्पर्धारॅली अशा प्रकारे विविध कार्यक्रमांतून संदेश देत कार्य करीत असतात.


तसेच पालघर जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान सुध्दा राबविण्यात येत आहेत.  या कार्यासाठी सुनिर्मल फाउंडेशनाचे प्रमुख पाहुणे मुंबईचे पहिले नगरपाल जगन्नाथराव हेगडेदैनिक प्रहार चे संपादक सुकृत खांडेकर यांच्या हस्ते मिलिंद रूपचंद पाटील यांना राज्यस्तरीय सुनिर्मल फाउंडेशनचा शिक्षणभूषण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

याबद्दल शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थीपालक मित्रपरिवार सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी सुनिर्मल फाउंडेशनाचे अध्यक्षकार्यक्रमाचे आयोजन दत्ता खंदारे व सुनिर्मल फाउंडेशनाचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments