प्रतिकुलतेतही वीज कर्मचाऱ्यांची तेजस्वी कामगिरी कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांचे प्रतिपादन


कल्याण: ०१ मे २०२२  :  ग्राहकांची प्रतिकूल मानसिकता व निसर्गाच्या विपरित परिस्थितीतही वीज कर्मचारी इतरांची घरे प्रकाशमान व्हावीत यासाठी करत असलेली कामगिरी तेजोमय आहे. त्यांच्या या कामातूनच महावितरणने आतापर्यंतची प्रगती साधली असल्याचे प्रतिपादन कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी केले.


कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षानंतर महाराष्ट्र दिनी उत्साहात साजरा होत असलेल्या कामगार दिनानिमित्त कल्याण परिमंडलातील उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना पुरस्काराने गौरवण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 


याप्रसंगी मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक श्री. धैर्यशिल गायकवाड, कल्याण मंडल एक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कल्याण मंडल दोन कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता किशोर ऊके, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


 सहव्यवस्थापकीय संचालक डांगे म्हणाले, वीज पुरवठ्यामध्ये व्यत्यय आल्यानंतर वीज कर्मचारी काहीच करत नसल्याची नकारात्मक भावना सर्वसामान्य लोकांकडून व्यक्त होते. परंतू सध्याचा वाढलेला तापमानाचा पारा असो अथवा वादळ, वारा, पाऊस अशा निसर्गाच्या विपरित परिस्थितीशी दोन हात करत वीज कर्मचारीच वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी अहोरात्र काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


वर्षभर उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, सुरक्षा साधने व या कार्यक्रमात प्रकाशित केलेली माहितीपर कार्यपुस्तिका देऊन गौरविण्यात आले. मुख्य अभियंता औंढेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व तांत्रिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामात महत्वपूर्ण ठरणाऱ्या कार्यपुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


पुरस्कार प्राप्त कर्मचारी


कल्याण मंडल एक –अतुल कराळे, संतोष बडगुजर, मनिषा सुतार, विठ्ठल पारधी, वसंत वारके, मनोहर दिघे, संजय कथोरे, योगेश विशे, पुंडलिक पाटील, सतिश व्यापारी, अशोक वारके, परेश जाधव, गजानन मारकवार.


कल्याण मंडल दोन –जितेंद्र लहाने, राजेंद्र पाटील, कैलास जाधव, नंदू निकम, अनिल मुसळे, पृथ्विराज दामले, संतोष मेरे, राकेश विशे, इंदल राठोड, कुणाल महाबळे, भगवान बहिरम, महेश बर्डे, बलबहाद्दूर गिरी, महेश कळसाईतकर, प्रविण अघळते.


वसई मंडल – विक्रम मालुसरे, रोहिदास लोखंडे, कल्पेश पाटील, विजय मर्ढेकर, सचिन निगुडकर, अनिल पाटील, संजय ठाकरे, अमित पामाळे, आदिनाथ लगड, नवनाथ बनकर, राहुल शटलवार. पालघर मंडल – रमाकांत पाटील, विलास मोरे, विनोद वाघमारे, सचिन भोये, राजेश खुताडे, मिथून महाला, मुकुंद धोडी, प्रमिला चौधरी, संतोष पाटील, धनाजी टिपे.

Post a Comment

0 Comments