कल्याण : महाराष्ट्रदिनी कल्याणत 'जपू या सामाजिक बांधिलकी' या संस्थेच्या हिंदु खाटीक समाजाने महिलांसाठी एक खास उपक्रम केला. ज्या मध्ये 'महिलांचा आर्थिक विकास' हा विषय होता. महिलांचा आर्थिक विकास होऊन त्या स्वतः सक्षम होऊन त्यांनी आपल्या बरोबर इतरांना देखील सक्षम करावे यासाठी गेले कित्येक दिवस 'जपू या सामाजिक बांधिलकी' च्या संस्थापक काजल प्रभाळे आणि त्यांच्या सहकारी विशाखा खांगटे महिलांसाठी खूप नव नवीन उपक्रम राबवत आहे.
महिलांनी स्वतःची मत मांडावी त्यांना त्यांचे स्वातंत्र्य मिळावे, त्यांनी पुढे येऊन स्वतः मध्ये बदल करावे, स्वतःला सक्षम बनवाव त्यांचा आत्म विश्वास वाढावा यासाठी त्या नेहमी प्रयत्नशिल असतात. महिलांनी स्वतःच्या पायावर उभ रहाव स्वतःचा व्यवसाय चालु करावा यासाठी त्यांनी लघुद्योग क्षेत्रातील ठाणे जिल्हा वरीष्ठ अधिकारी अजय कुमार पाटील महाव्यवस्थापक आणि त्यांचे सहकारी यांच्या सोबत मीटिंग करून महिलांना सबसिडी लोन भेटून त्यांना व्यवसाय देता यावा या संदर्भात काही दिवसांपूर्वी मिटींग केली.
सर्व महिलांना एकत्र करून त्याबद्दल त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच बॅंक लोन करताना कोणत्या अडचणी नको म्हणून बँकेच्या अधिकार्याना देखील तेथे बोलण्यात आले. लघुद्योगातील वरिष्ठ जिल्हा प्रकल्प अधिकारी सुबोध सिंह बायस यांनी खूप सुंदर प्रकारे महिलांना कोणते व्यवसाय केले पाहिजे यावर मार्गदर्शन केले.
यावेळेस त्यांच्या सोबत प्रशिक्षण अधिकारी संध्या यवले या देखील उपस्थित होत्या. युनिअन बॅंकेचे वरिष्ठ क्षेत्र प्रबंधक अधिकारी रेणु नायर यांनी महीलांना बँकेच्या सर्व नियमांबद्दल मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबत शिल्पा सरकार जिल्हा असीस्टंट जनरल हेड आणि स्वामीनाथन अय्यर कल्याण ब्रांच हेड देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सर्व नियोजन काजल राहुल प्रभाळे आणि विशाखा विवेक खांगटे यांनी केले. यासाठी त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष तुकाराम डोंगरे यांची साथ मिळाली तसेच त्यांचे सहकारी योगिता प्रभाळे, रेश्मा कांबळे यांनी उत्कृष्ठ निवेदन करून सभा छान रंगवली. या कार्यक्रमाला हिंदु खाटीक समाजाचे महिला जिल्हा अध्यक्ष शीतल इंगवले, ऍड. शुभांगी घोडके, राष्ट्रीय अध्यक्ष तुकाराम डोंगरे, सुरेश घोणे तसेच सुर्यकांत खराटे उपस्थित होते.
0 Comments