जेनवर्कद्वारे इव्हा कॉल्पोस्कोप उपकरणाचे अनावरण महिलांच्या सर्व्हायकल तपासणीसाठी उपयुक्त ~

 


मुंबई, २६ मे २०२२ : जेनवर्क्स या भारतात आरोग्यसेवा जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने सुरू झालेल्या भारतीय आरोग्यसेवा उद्योगातील पहिल्या स्टार्टअपने अलीकडेच इव्हा कॉल्पोस्कोप (इव्हा कॉल्पो) या नॉन इन्व्हेसिव्ह उपकरणाचे अनावरण महिलांच्या सर्व्हायकल तपासणीसाठी केले आहे. स्टेथोस्कोप फॉर गायनॅकॉलॉजी या नावाचे हे उपकरण एका स्मार्टफोनइतके पातळ व लहान आहे आणि ते शरीरात प्रवेश करत नसल्यामुळे महिलांना आराम देणारे आहे.


अनेक महिलांना गायनॅकॉलॉजिस्ट तपासणीची भीती वाटते आणि त्यांना लाज, चिंता व त्रास वाटतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन जेनवर्क्सने या हलक्या वजनाच्या, पूर्णपणे पोर्टेबल आणि एफडीए मान्यताप्राप्त उपकरणाचा विकास केला आहे. इव्हा कॉल्पोमधून मेडिकल प्रोसिजरची डिजिटल चित्रे आणि व्हिडिओ रिअलटाइममध्ये रूग्णांना दाखवली जातात आणि त्यामुळे त्यांची काळजी कमी होते. 


गायनॅकॉलॉजिस्ट आता योनी, व्हल्व्हा आणि सर्विक्स या भागांचे चित्र उपकरणाचा वापर करून अधिक अचूकतेने उपचारांची तपासणी करू शकतात. या साधनाचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे सहाय्यक कर्मचारी किंवा सुविधांचा अभाव असातनाही हे उपकरण वापरता येऊ शकते.


जेनवर्क्सचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एस. गणेश प्रसाद म्हणाले की, “ईव्हा कॉल्पोचा वापर अत्यंत कमी सोर्स सेटिंगमध्येही करता येतो. येथे प्रशिक्षित पॅरामेडिक त्याचा वापर करून तपासणी करू शकतात. हे उपकरण कॅन्सरपूर्व टप्प्यातच संभाव्य केसेसचे निदान करण्यास मदत करू शकते. 


एक सौम्य डिस्प्लेसिया कर्करोगात रूपांतरित होण्यासाठी १० ते २० वर्षांचा कालावधी लागतो. नियमित तपासणी केल्यास हे टाळता येऊ शकते. इव्हा आपल्या अद्ययावत इमेजिंग क्षमता आणि क्लाऊड कनेक्टिव्हिटीसोबत एआय इंटरप्रिटेशनचा वापर करून तुम्हाला हे ध्येय साध्य करण्यात मदत करते.”


वापरातील सुलभता मान्य करताना एसआरएम कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कट्टनकुलाथूरच्या प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. एम. अनुराधा म्हणाल्या की, “इवा कॉल्पो हे आधीच्या कॉल्पोस्कोपच्या तुलनेत हाताळण्यास सोपे आणि अत्यंत सुलभ आहे. मी ते माझ्या रूग्णालयात वापरते आहे आणि त्याचा वापर प्रामुख्याने अनियमित गर्भाशय आणि अनियमित पॅप स्मिअरसाठी केला जातो. माझ्या एकाही रूग्णाने या उपकरणाच्या वापराबाबत कोणताही आक्षेप घेतलेला नाही.”


तपासणीदरम्यान आलेली सर्व चित्रे डिजिटल पद्धतीने दस्तऐवजीकरण करून अर्काइव्ह केली जातात. यामुळे डॉक्टरांना अर्काइव्ह केलेल्या चित्रांच्या निष्कर्षाची तुलना विद्यमान चित्रांशी करणे, त्यांच्या रूग्णांना शिक्षित करणे आणि अधिक पारदर्शकता राखणे शक्य होते. इव्हा कॉल्पो पॅरामेडिक कर्मचाऱ्यांना कमी दर्जाच्या लेसन प्रकरणात अधिक चांगल्या प्रकारे लेसन समजून घेण्यात मदत करते. कारण त्या शोधण्यात खूप कठीण असतात.


इव्हा कॉल्पो भारतीय रूग्णालयांमध्ये गायनॅकॉलॉजीचे रूप पालटू शकतात आणि सुरूवातीच्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान करू शकतात. हे सर्व रूग्णाला आराम देऊन करता येते.

Post a Comment

0 Comments