भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र दिना निमित्त पोलीस बांधवांसाठी मिसळपावचे आयोजन


डोंबिवली ( शंकर जाधव )  भाऊ चौधरी फाउंडेशन आणि आराध्या ग्रुप फाऊंडेशनच्या वतीने सावळाराम क्रीडा संकुल येथे २९ एप्रिल ते १ मे 'मिसळ महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. खाद्यप्रेमींनी आनंदाने स्वीकारल्यामुळे हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे. ६२ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजक अभिषेक भाऊसाहेब चौधरी, राज परब, संतोष कोरडे यांनी पुढे येऊन मानपाडा पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मिसळ पावाचे आयोजन केले.      
  

 खाद्य महोत्सवसारखे अनेक कार्यक्रम शहरात होत असतात, नेहमी पोलीस कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन व सहकार्य आयोजकांना लाभते. कामाचे तास आणि कर्तव्यामुळे त्यांना महोत्सवात उपलब्ध असलेल्या विविध खद्या पदार्थांचे स्वाद घेता येत नाही. या करणानेच या मिसळ महोत्सवात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारची मिसळ या मानपाडा पोलिस बांधवांना चाखता यावी यासाठी उपलब्ध करून दिली. 


शिवसेना नेते तथा  खासदार संजय राऊत हे आपल्या जावई मल्हार राजेश नार्वेकर समवेत या कार्यक्रमाला भेट दिली, दोघांनी मिळणाऱ्या विविध प्रकारची मिसळ चाखली. संजय राऊत यांना पाहून लोक भारावून गेले, त्यामुळे महोत्सवाचा दुसरा दिवस आनंदात संपन्न झाला. या महोत्सवाला डोंबिवली आणि कल्याणमधील रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Post a Comment

0 Comments