दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगाराला एक वर्षासाठी स्थानबद्ध महात्मा फुले चौक पोलिसांची कारवाई

 


कल्याण : महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण हद्दीत दहशत पसरविणाच्या धोकादायक अट्टल गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायदयान्वये ०१ वर्षे स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे.महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जोशीबाग येथे राहणारा कुप्रसिष्द् गुन्हेगर शाहबाज एजाज सय्यद(२८) याच्यावर खुनाचा प्रयत्न, घराविषयी आगळीक करुन आपखुषीने दुखापत करणेआपखुषीने साध्या व गंभीर दुखापती करणेबेकायदेशीर जमाव जमवून गर्दीमारामारी, दमदाटी व शिवीगाळ करुन मारहाण करणेघातक शस्त्र वापरुन दंगा करणेघातक शस्त्र जवळ बाळगणेजीवे ठार मारण्याची धमकी देणे असे शरीरा विरुद्ध व मालमत्तेचे गंभीर स्वरूपाचे १२ गुन्हे महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल होते.या इसमाने कल्याण (प.) परिसरात प्रचंड दहशत निर्मण केली होती. त्यामुळे तो सार्वजनिक शांततेस धोका निर्माण झाला होता. म्हणुन त्याच्या विरुद्ध एम.पी.डी. ए.कायदा १९८१(सुधारीत १९९६) अन्विये स्थानबध्दुतेची कारवाई करण्याकरीता पोलीस आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा  प्रस्ताव मंजुर होवुन धोकादायक गुन्हेगार शाहबाज एजाज सय्यदयास १ वर्ष स्थानबध्दतेचे आदेश झाल्याने त्याला आज मध्यवर्ती कारागृहनाशिक रोडनाशिक येथे १ वर्षाकरीता स्थानबध्द करण्याकरीता रवाना केले.पोलीस आयुक्तांनी वेळोवेळी अशाप्रकारे सार्वजनिक शांतता धोक्यात आणणाऱ्या व समाजामध्ये दहशत न करणाऱ्या सक्रीय गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले आहे. तसेच सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळेपोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळसहाय्यक पोलीस उमेश माने-पाटील यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचना व आयुक्तमार्गदर्शनानुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकारचे धोकादायक व सक्रीय गुन्हेगार यांची महात्मा फुले चौक पो. ठाणे यांनी यादी तयार केली असुन नजीकच्या काळात आणखी अशाप्रकारे सक्रीय असणाच्या गुन्हेगारांवर जास्तीत जास्त कड़क प्रतिबंधक कारवाई करून एम.पी. डी.ए.कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायदयान्वये हद्दपार करण्यात येणार असल्याची माहिती महात्मा फुले पोलीस स्टेशनचे व.पो.नि. अशोक होनमाने यांनी दिली.

Post a Comment

0 Comments