एंजल वनची ग्राहक संख्या १० दश लक्षांवर पोहोचली


मुंबई, ३० मे २०२२ : उद्योगामध्ये अव्वल स्थान संपादित करण्याच्या दिशेने वाटचाल करत एजंल वन लिमिटेडने (पूर्वीची एंजल ब्रोकिंग लिमिटेड) मार्च २०२१ पासून आपल्या ग्राहकसंख्येत दुपटीहून अधिकने वाढ करत १० दशलक्षापर्यंत विस्तारत अद्भुत कामगिरी दाखवली आहे. कंपनीच्या या नवीन उपलब्धीमधून रिटेल ब्रोकिंग उद्योगामधील प्रत्यक्ष ते डिजिटल कंपनी म्हणून विकसित होण्याच्या निर्णयासंदर्भात व्यवस्थापनाने दाखवलेला आत्मविश्वास दिसून येतो.


 या उच्च आत्मविश्वासामुळे सुधारित ग्राहक समाधान, सर्वेक्षण व अॅप रेटिंग्जमध्ये उत्तम स्कोअर्ससह एंजल वन टेक व्याससपीठाचा वापर करणा-या ग्राहकांची संख्या १० दशलक्षांवर पोहोचली आहे. यामधून एंजल वन संपत्ती निर्मितीसाठी त्यांचे पसंतीचे गंतव्य म्हणून कायम राहण्याची खात्री मिळाली आहे.


तंत्रज्ञान सक्षम व्यासपीठाच्या या उत्क्रांतीसह ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन आणि साधेपणा प्रबळ ऑपरेटिंग मार्जिन्स व लाभांसह संपादित करण्यात आला आहे. एजंल वन भारतातील रिटेल ब्रोकिंग उद्योगामध्ये खंबीरपणे प्रबळ राहिली आहे. नवोन्मेष्कार-केंद्रित व्यासपीठ असलेली एंजल वन मागील काही वर्षांमध्ये डिजिटल-फर्स्ट ब्रॅण्डमध्ये झपाट्याने रूपां‍तरित झाली आहे. दर्जात्मक तंत्रज्ञान व उत्‍पादन श्रेणीवरील प्रबळ फोकस सर्व घटकांमधील अद्भुत वाढीसाठी अग्रणी स्रोत राहिले आहे.


आर्थिक वर्ष २२ मध्ये कंपनीचा भारतातील डिमॅट खात्यांमधील शेअर आणि एनएसई सक्रिय ग्राहकवर्ग अनुक्रमे १०.३ टक्के व १०.३ टक्क्यांपर्यंत वाढला. एंजल वनचे वाढीव एनएसई सक्रिय ग्राहकांमधील शेअर वर्षभरात १२.२ टक्क्यांपर्यंत पोहोचले. कंपनीची आर्थिक वर्ष २२ ची सरासरी दैनंदिन उलाढाल वार्षिक २२६.३ टक्क्यांच्या वाढीसह ६.५ ट्रिलियन रूपयांपर्यंत वाढली,


जी एप्रिल २०२२ मध्ये वार्षिक ११४.४ टक्क्यांच्या वाढीसह ९.५ ट्रिलियन रूपयांपर्यंत वाढली. तसेच कंपनीने आर्थिक वर्ष २२ मध्ये ६८०.१ दशलक्ष ऑर्डर्सची नोंद केली, ज्यामधून वार्षिक ९७.३ टक्के वाढ दिसून आली. कंपनीच्या ऑर्डर्सची आकडेवारी एप्रिल २०२२ मध्ये ६५.७ टक्क्यांनी वाढून ६६.१ दशलक्षांपर्यंत पोहोचली.

 

एंजल वन लि.चे मुख्य विकास अधिकारी श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले, "आम्ही सुरुवातीच्या काळात केलेल्या तंत्रज्ञान प्रगतीने आज आमच्या व्यवसायाने मिळवलेल्या अतुलनीय वाढीसाठी पाया रचला. आमचा दृष्टीकोन आणि धोरणे लक्ष्यित वाढ साध्य करण्याच्या दिशेने उल्लेखनीय परिणामांसाठी सहाय्यक ठरले आहेत. आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि गुंतवणुकीचे उपाय अधिक सुलभ करण्याच्या भावी दिशेने वाटचाल करण्यास उत्सुक आहोत."


एंजल वन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले, "विकास व विस्तारीकरणाच्या संदर्भात मागील काही वर्षे एंजल वनसाठी उल्लेखनीय राहिली आहेत. आम्हाला १० दशलक्ष ग्राहकांसाठी पसंतीचा भागीदार असण्याचा आनंद होत आहे, जेथे त्यांचा संपत्ती निर्माण करण्याच्या प्रवासामध्ये आमच्यावर विश्वास आहे.


या आकडेवारींमधून आम्हाला आत्मविश्वास मिळतो की, आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहोत. आम्ही आमच्या सेवांमध्ये प्रगत तंत्रज्ञानांचा समावेश करणे आणि भांडवल बाजारपेठेतील सहभाग अधिक लोकशाहीवादी करणे सुरूच ठेवू."

Post a Comment

0 Comments