कल्याण : पडघा रेंज मधील किरवली परिमंडळ मधील कोरडे पाडा, विश्वगड या गावालगत राखीव वन क न १०२८ १०२९ मध्ये ठिकठिकाणी वन्य प्राणी, पशु पक्ष्यांसाठी स्थानिक गावकऱ्यांच्या श्रमदानातून, सहकाऱ्याने पाणवठे तयार करण्यात आले. या ठिकाणी वनविभाग करीत असलेल्या अभिनव कामाचे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आवळे विश्वगड तथा जेएफएम समिती अध्यक्ष अनंता जाधव यांनी आपल्या भाषणात कौतुक केले. तसेच वनपाल किरवली साहेबराव खरे यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,जेएफएम सदस्य व इतर सहभागी ग्रामस्थ यांचे आभार मानले.
या अभिनव वन्य प्राणी, पक्षी साठी पाणवठे तयार करण्यासाठी जमलेले उत्साही ग्रामस्थ यांनी मोठ्या आनंदात सहभाग घेतला. वनपाल किरवली साहेबराव खरे, यांच्यासमवेत सरपंच अनंता जाधव, उपसरपंच निखिल जाधव, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ जाधव, ग्रामस्थ बाळाराम कोरडे, वसंत वड, विष्णू वड, दीपक जाधव, प्रदिप जाधव, भगवान जाधव, संदीप कोरडे, समीर वड, सुनील मांजे, विशाल जाधव, विकास जाधव, शांताराम भोईर, शांताराम जाधव, लहू जाधव, नामदेव मांजे यांनी सहभाग घेतला.
0 Comments