रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनची सर्वसाधारण सभा संपन्न

■रिक्षा चालकांच्या प्रलंबित विविध प्रश्न समस्या यावर चर्चा

कल्याण : रिक्षा चालक मालक असोसिएशन कल्याण शहर पदाधिकारी स्टॅण्ड प्रमुख कार्यकर्ते यांची सर्वसाधारण वार्षिक सभा मोरया मॅरेज हॉल येथे संपन्न झाली. दिवंगत नेते प्रकाश पेणकर यांचे प्रतिमा पुजन व नुकतेच निधन झालेले ठाणे महापालिका ज्येष्ठ माजी नगरसेवक कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे नेते सुधाभाई चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेस सुरुवात झाली.


रिक्षा चालक पदाधिकारी यांच्या सभेत प्रवाशाचे रिक्षात विसरलेले महत्त्वाचे कागद पञ व मौल्यवान चिज वस्तू असलेली बॅग प्रामाणिकपणे संघटनेच्या कार्यालयात जमा करणारे प्रामाणिक रिक्षा चालक हौशिप्रसाद मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला. रिक्षा चालकांच्या शासन दरबारी प्रलंबित विविध प्रश्न समस्या सोडविण्यासाठी चर्चा विनमय करण्यात आले.


शासनाने खुले केलेले रिक्षा परवाने त्यामुळे रिक्षांची अमाप संख्या वाढुन वाहतुक कोडीं विविध समस्या रिक्षा व्यवसाय धंद्यावर झालेला विपरित परिणाम रिक्षा चालकांचे घटलेले उत्पन्न,  रिक्षा चालकांसाठी केरळ तामिळनाडू सरकारचे धर्तिवर कल्याणकारी महामंडळ अमलबजावणीसीएनजी इंधन दरवाढ पेट्रोल डिझेल दरवाढी प्रमाणे दर कमी करणे, मोटार वाहन कायदा सुधारणा विधेयक याप्रमाणे वाढलेले विविध दंडवाहतुक पोलिस फोटो शुट ईचलन दंडात्मक कारवाई असलेल्या ञुटी रिक्षा चालंकावर चुकीचे पध्दतीने होत असलेली दंडात्मक कारवाई विविध प्रश्नांवर शासन परिवहन प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल लवकरच रिक्षा चालंकाचे प्रश्न सोडविले नाही तर अन्यथा १ जुलै २०२२ पासुन कोकण विभागात रिक्षा चालकांचे तिव्र आदोलंन छेडले जाईल असा इशारा अध्यक्ष प्रणव प्रकाश पेणकर यांनी दिला.


नविन रिक्षा परवाने वाटप लवकरच बंद होतिल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.  भविष्यात सॅटीसचे काम पुर्ण झाल्यानंतर ठाणे शहराच्या धर्तिवर कल्याण स्टेशन परिसरात शिस्तबद्ध सुयोग्य वाहतुक व्यवस्था नियमन व तक्रार विरहित रिक्षा प्रवास सोयीसुविधा उपलब्धता याकरिता प्रशासनाकडुन स्टेशन परिसरात फक्त मिटर पध्दतीने रिक्षा प्रवास अमलबजावणी करण्याची शक्यता आहे असे मत सभेत बोलताना प्रणव पेणकर यांनी व्यक्त केले.  कार्याध्यक्ष संतोष नवले यांनी प्रास्ताविक केले.  सभेचे सुञसंचालन उपाध्यक्ष जितेद्रं पवार यांनी केले. सेक्रेटरी विलास वैद्य यांनी आभार मानले.


मोहने आबिवंली विभागिय अध्यक्ष शिवाजी पाटील,  कल्याण पुर्व उपाध्यक्ष हरी भालेराव ,प्रकाश हजारे वसंत पाटिल यांनी रिक्षा चालकांच्या विविध समस्यां सभेत कथन केल्या. याप्रसंगी ज्येष्ठ पदाधिकारी सतिष आप्पा मलबारी,  सुबल डे,  अब्दुल शेखनुर जमादारअसगर कुरेशीकाका मढवीमोहन म्हाञे,विजय डफळसंजय बागवेबंडु वाडेकरप्रकाश भोरसुशांत गोडांबेशशी मुसमाडेचंद्रशेखर नवलेदिलीप पाटील,  हिरु लोखंडे,  विलास भोईर,  सुदंर गुप्ताअमजद पठाण,  नसीम खान गणेश घायाळ,  सुनिल मोरे.सलिम शेखआबांदास चौधरी संजय राठोडनंदु भालेरावराहुल पांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments