डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाचा अवमान सहन करणार नाही - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

धारावीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उदघाटन


 मुंबई दि. 8 ; -  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाला दिलेल्या संविधानाचा अवमान आम्ही सहन करणार नाही.भारतीय संविधानाचा अवमान करण्याचा प्रयत्न करतील त्यांचा आम्ही सत्यानाश करू असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिला आहे. 


धारावी क्रॉस रोड येथे बॉम्बे साऊथ इंडियन आदी द्रविड महाजन संघाच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा ब्रॉंझचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण आज  केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले आणि तामिळनाडूतील खासदार  तिरमा वेलवन यांच्या हस्ते करण्यात आले.  त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ना.रामदास आठवले बोलत होते.


 या कार्यक्रमाचे आयोजन आदी द्रविड महाजन संघाचे अध्यक्ष मारी यांनी केले.यावेळी रिपाइं चे फादर सुसाई;सिद्धार्थ कासारे; सचिनभाई मोहिते आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments