डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्ज्याचे काम होईल का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.यावर पालिका प्रशासनावर अनेक वेळेला ताशोरे ओढेल जातात. यावर मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी रस्त्याच्या कामांवर माझे लक्ष आहे. त्यामुळे रस्त्याचे काम चांगल्या दर्ज्याचे काम होईल अशी आशा व्यक्त केले.डोंबिवलीतील संघवी गार्डन विभागातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन कामाच्या वेळी ते बोलत होते.
कल्याण डोंबिवली महानगर पालिका माध्यमातून संघवी गार्डन विभागातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण व्हावे ही येथील करदात्या नागरिकांची मागणी होती. यासाठी नांदिवली विभागातील भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष सचिन म्हात्रे हे पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. अखेर मनसे आमदार पाटील यांनी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी त्यांच्या आमदार निधीतून निधी खर्ची केला आणि त्या कामाचे भूमिपूजनही केले. परिणामी आता सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चांगला रस्ता मिळणार असल्याने येथील नागरिक सुखावले आहेत.
प्रभाग क्र.११५ मधील संघवी गार्डन विभागात सातवर्षांपूर्वी तत्कालीन प्रभाग क्र.११५ मधीलनांदिवली पंचनांद ग्रामपंचायत माध्यमातून सचिन म्हात्रे यांनी येथील रस्त्याचे डांबरीकरण केले होते. आता त्या रस्त्याची डागडुजी करून डांबरीकरण करणे गरजेचे असल्याचे येथील नागरिकांची मागणी होती. या संघवी गार्डन विभागात सुमारे 600 कुटूंब वास्तव्य करीत असून येथील लोकसंख्या सुमारे 2500 आहे. याच भागात पूर्वी मनसे आमदार राजू पाटील हे १४ वर्ष राहिले होते.
त्यामुळे या विभागाशी त्यांचे जिव्हाळ्याचा संबंध आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण गरजेचे आहे ही वस्तुस्थिती सचिन म्हात्रे यांनी आमदार पाटील यांन सांगितले. आमदार पाटील यांनी रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या पालिकेच्या दुर्लक्षित कारभारला चोख उत्तर देत आमदारकीच्या निधीतून डांबरीकरण काम हाती घेतले. त्याच कामाचे भूमिपूजन मनसे आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष सचिन म्हात्रे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी, यांसह काशिनाथ पाटील, योगेश पाटील, संजय राणे, अक्षय घाग आणि संघवी गार्डन वसाहतीतील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार पाटील म्हणाले, सदर रस्त्याचे काम नक्की व्यवस्थित होईल. ठेकेदार काम करतांना तो रस्ता मजबूत आणि टिकाऊ होईल यासाठी सर्वांनी लक्ष द्या. ठेकेदार काम चांगलेच करेल याचा पूर्ण विश्वास आहे परंतु तुम्ही सर्वांनी लक्ष दिले तर त्याचा फायदाच होईल. दरम्यान काम करताना गटारे आणि इतर सोई-सुविधा कराव्या लागल्या तर त्याही करून घ्या यासाठी जास्त निधी लगला तर तो ही विषय मार्गी लावू.
0 Comments