भिवंडीत सैन्य दलातून सेवानिवृत्त जवानास दिली मानवंदना, शिवसैनिकांनी केले भव्य स्वागत..भिवंडी दि 2(प्रतिनिधी )भारतीय सीमेवर डोळ्यात तेल घालून रक्षण  करणाऱ्या सैन्य दलातील जवानां बद्दल सर्व देशवासियां कडून अभिमान बाळगला जातो.भिवंडी शहरातील शिवशंकर भागवत क्षीरसागर हे 12 मराठा लाईट इंफ्रांटी रेजिमेंट मध्ये तब्बल 17 वर्ष देशसेवा करून नुकतेच  सेवानिवृत्त झाले .त्यांच्या भिवंडी आगमन प्रसंगी धामणकर नाका ते कामतघर  पर्यंत भव्य मिरवणूक काढून त्यांच्या देशसेवेस मानवंदना देण्यात आली.


भिवंडी येथील सैनिक फेडरेशन, वरीयर ग्रुप,आर्मी फॅन्स ग्रुप व बी एन एन महाविद्यालय माजी एन सी सी कॅडेट यांच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले .धामणकर नाका ते कामतघर येथ पर्यंत काढलेल्या मिरवणुकीत सैनिक शिवशंकर भागवत क्षीरसागर यांसह त्यांचे कुटुंबीय हे उघडया जीप मधून सहभागी झाले होते त्यापुढे एन सी सी कॅडेट, व वरीयर ग्रुप च्या जवानांनी संचालन केले .


तर मिरवणुकीचे संपूर्ण रस्त्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले महत्वाची बाब म्हणजे   शहरातील कामतघर येथील शिवसेनेच्या शाखा स्थापन झाल्यापासून क्षीरसागर कुटुंबीय हे कट्टर शिवसैनिक आसल्याने  याच कुटुंबातील शिवशंकर भागवत क्षीरसागर हे देशाचे सैनिक होवून, 17  वर्षे देशाची सेवा केल्याची दखल घेऊन माजी उप  महापौर , नगरसेवक मनोज काटेकर यांना मिळताच त्यांनी कामतघर शाखेतील पदाधिकारी आणि शिवसैनिकांना त्यांचा भव्य सन्मान आणि सत्कार करण्याच्या सूचना दिल्याने शिवशंकर  क्षीरसागर यांचे कामतघर परिसरात आगमन होताच भव्य असा सन्मान करून सत्कार करण्यात आला आहे..

Post a Comment

0 Comments