दोनही हात नसणारा पायाने कॅरम खेळणारा दिव्यांग कॅरमपटू हर्षद शंकर गोठणकर ठरला कॅरम स्पर्धेचे आकर्षण

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र ६७ म्हात्रे नगर- राजजीपथ च्या वतीने  १ मे  महाराष्ट्र दिना निमित्त नगरसेवक श्री मुकुंद(विशू) पेडणेकर यांच्या पुढाकाराने म्हात्रे नगर मधील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी बंदिस्त क्रीडा संकुल येथे विविध वयोगटातील कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते.दोन्ही हात नसणारा पायाने कॅरम खेळणारा दिव्यांग कॅरमपटू  हर्षद शंकर गोठणकर हा कॅरम स्पर्धेचे आकर्षण ठरला.

    
स्पर्धेस हौशी कॅरम खेळाडूंचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। स्पर्धेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.स्पर्धेत  दोनही हात नसणारा पायाने कॅरम खेळणारा दिव्यांग कॅरम पटू  हर्षद शंकर गोठणकर याचा खेळ पाहण्यासाठी गर्दी झाली होती. सदर स्पर्धा आयोजनात  म्हात्रे व  साटम तसेच भा. ज.यु.मोर्चा प्रभाग क्र६७ म्हात्रे नगर येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


सदर स्पर्धेचा बक्षिस समारंभ गीता नायर, कल्याण जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मिहीर देसाई, माजी नगरसेवक मुकुंद(विशू)पेडणेकर, म्हात्रे व श साटम यांच्या हस्ते पार पडला.सदर स्पर्धेसाठी  शहर सचिव अमित कासार,   वॉर्ड अध्यक्ष अमित टेमकर, युवा मोर्चा अध्यक्ष प्रथमेश सावंत, संतोष देसाई, रवी साळवी, अर्जुन साळवी, विक्की कानोजिया, किरण कांबळे, स्वप्निल कांबळे, विद्याधर जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments