राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल वरील अन्यायकारक कर त्वरित कमी करावे .... भाजयुमोची मागणी


डोंबिवली ( शंकर जाधव) राज्य सरकार कडून आकारण्यात  येणारे इंधनावरील कर कमी करण्याची मागणी करत भारतीय जनता युवा मोर्चा  कल्याण जिल्हा पदाधिकाऱ्यांनी  तहसीलदार जयराज देशमुख यांची भेटून निवेदन दिले.


भाजयुमो कल्याण  जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई,जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, अजिंक्य पवार, जिल्हा सचिव चिंतन देढिया, धृ मेहता, सुहास चौधरी, मंडल अध्यक्ष सत्येंद्र दुबे उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई म्हणाले, जागतिक स्तरावर कच्या तेलाचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत.


असे असताना देशातील जनतेला महागाई पासुन दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने  केंद्रीय उत्पादन शुल्कामधुन पेट्रोलवर ८ रूपये आणि डिझेलवर ६ रूपये कमी केले.यामुळे केंद्र सरकारला जवळपास २ लाख कोटींपेक्षा जास्तचा भार बसणार आहे. 


पण केवळ जनतेचे हित लक्षात घेता केंद्र सरकारने हे पाऊल उचलले. केंद्र सरकार कर हा १९ रुपये आकारते आहे तर ३० रूपये कर हा राज्य सरकार आकारते. महाराष्ट्र राज्य संपुर्ण देशामध्ये पेट्रोल, व डिझेलवर सर्वात जास्त कर आकारणारे राज्य असुन जनतेच्या हितासाठी व महागाई कमी करण्यासाठी तत्काळ हे इंधनावरील कर कमी करण्यात यावे. 


संपुर्ण देशातील इतर राज्य १७ - १८ रूपये कर आकारत असतांना महाराष्ट्र सरकारमधील महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात आकारण्यात आलेला कर हा जनतेवर होणारा घोर अन्याय आहे. भारतीय जनता युवा मोर्चा द्वारे सरकारला मागणी केली की राज्य सरकारद्वारे आकारण्यात येणारा इंधनावरील कर हा त्वरित कमी करण्यात यावा जेणेकरून महागाईला आळा बसेल आणि जनतेला दिलासा मिळेल. 


सरकारने तत्काळ ह्या बाबत अंमल बजावणी करावी अन्यथा युवा मोर्चा आंदोलन करेल असे जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई ह्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments