कल्याणात एम् सी एच् आय् माध्यमातून प्रॉपर्टी एक्स्पोच आयोजन

           


कल्याण :- गत२ वर्ष कोरोना महामारीचा आपण सर्व सामना करत होतो. रोजच्या धावपळीत आपण घरात फार कमी वेळ राहायचो पण कोरोनाने आपल्या सर्वांना घरातच कोंडून ठेवल. जे घर बनवण्यासाठी आपण जीवाचं रान करतो त्याच घरात २४ तास राहणं आपल्याला नकोस झालं होत. स्वतःच घर नसल्यामुळे अनेकांना तर अनेक संकटाचा सामना करावा लागला होता. त्यामुळेच तर प्रत्येकाला स्वतःच्या घराचं महत्व आता कळलेलं आहे.


 या २ वर्षात आम्ही सर्व विकासक देखील अशाच परिस्थितीचा सामना करत होतो. काम बंद होती. सामान मिळत नव्हते. कामगार काम सोडून गावी गेले होते. पण आता गेल्या २ वर्षाचा हा काळ विसरून पुन्हा एकदा मोकळा श्वास आपण सर्व घेत आहोत. अनेकांचे घर घेण्याचं स्वप्न या काळात अर्धवट राहील होत.


हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी CREDAI MCHI कल्याण डोंबिवली युनिट सज्ज झाली आहे. आपल्याला हव तस आणि आपल्या बजेट मध्ये बसेल असं घर निवडणं ग्राहकांना आता सोप्प होणार आहे. प्रत्येकाला हक्काचे घर मिळण्यासाठी CREDAI MCHI कल्याण डोंबिवली युनिटच्या माध्यमातून प्रॉपर्टी एक्स्पोच आयोजन करण्यात आले आहे


प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असत स्वतःच्या हक्काचं आणि स्वतःच्या मालकीच घर असावं त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा CREDAI MCHI कल्याण डोंबिवली युनिटच्या माध्यमातून प्रॉपर्टी एक्स्पोच आयोजन करण्यात आले आहे. प्रॉपर्टी एक्स्पो चे हे ११ वे वर्ष असून येत्या १९ मे ते२२ मे दरम्यान कल्याण पश्चिम येथील लाल चौकी फडके मैदान येथे हा प्रॉपर्टी एक्स्पो भरणार आहे. 


३५+ डेव्हलपर्स आणि १५०+ प्रोजेक्ट एका छताखाली ग्राहकांना बघता येणार आहेत. आणि गेल्या अनेक वर्षाचा अंदाज बघता या वर्षी २० हजाराहून अधिक ग्राहक या एक्स्पो ला भेट देतील असा अंदाज आमच्या कमिटीला असल्याची महिती अध्यक्ष श्रीकांत शितोळे, पदाधिकारी, नेते   रवी पाटील यांनी दिली


या प्रॉपर्टी एक्स्पोला ठाणे जिल्हा पालक मंत्री व सार्वजनिक बांधकाम तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील , गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड , खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर , कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ. विजय सूर्यवंशी , आमदार विश्वनाथ भोईर , गणपत गायकवाड , रवींद्र चव्हाण , राजू पाटील तसेच अनेक मान्यवर भेट देणार आहेत. या वर्षी एक्स्पोला खास भेट देण्यासाठी सुप्रसिद्ध सिने कलाकार  श्रेयस तळपदे देखील आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments