महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघाच्या आंदोलनाला यश

■कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनानंतर थकीत वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा


कल्याण :  राष्ट्रीय मजदुर कॉग्रेस (इंटक) संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघाच्या आंदोलनाला यश मिळाले असून कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनानंतर थकीत वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या ३महीने थकीत वेतनासाठी इंटकचे प्रदेश अध्यक्ष किशोर खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार नेते कोणार्क देसाई यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात कामबंद आंदोलन करण्यात आले. या कामबंद आंदोलनात १५ नागरी आरोग्य केंद्रावरील कार्यरत कर्मचारी सहभागी झाले होते.             प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ आरोग्य विभाग प्रमुख डॉ. अश्विनी पाटील यांनी संघटनेचे प्रमुख सल्लागार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव प्रकाश मुथाकामगार नेते कोणार्क देसाई व संघटनेचे सदस्य यांच्याशी चर्चा करून दोन ते तीन दिवसात थकीत वेतन देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.      त्यामुळे पुकारले कामबंद आंदोलन यशस्वी झाले कामगार वर्गामध्ये आनंदी वातावरण आहेया प्रसंगी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र राज्य  सचिव विक्रम राठोड, हेड सिस्टर  निकीता, सिस्टर वृंदा, रेश्मा सोर्टे,रोहीनी सिस्टर, जयश्री सिस्टरसुवर्णा शिंदेविशाल गायकवाडअर्पिता सिंगजयश्री पाटीलनेहा आवसकरशिवकन्या सातभाईराधिका नागेमाया गडमेमुक्ता सिस्टरकलावती सिस्टर यांच्यासह  इतर कर्मचारी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments