स्वामी विवेकानंद गोपाळनगर शाळेत महाराष्ट्र दिन साजरा


डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, गोपाळनगर शाळेत आज एक मे महाराष्ट्र दिन गोपाळ नगर प्राथमिक माध्यमिक व गणेशपथ प्राथमिक यांच्यात संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.गोपाळनगर माध्यमिक शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिक विद्या कुलकर्णी यांच्या हस्ते सकाळी ठीक सात वाजता ध्वजारोहण करण्यात आले.


 आजच्या कार्यक्रमाला तिन्ही शाळांच्या शाळा समिती सदस्या  अश्विनी बापट, गणेशपथ प्राथमिकच्या प्रभारी मुख्याध्यापिका महाकाळ, गोपाळनगर प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका भावना राठोड,  गोपाळनगर गणेशपथ प्राथमिक व माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ नगर प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सरोजिनी महाजन यांनी केले.


 कार्यक्रमाची व ध्वजाची संपूर्ण तयारी  गोपाळ नगर माध्यमिक शाळेचे क्रीडाशिक्षक जाधव यांनी केली.तिन्ही शाळांच्या सहकार्याने आजचा झेंडावंदनाचा कार्यक्रम नियमानुसार व्यवस्थित पार पडला.

Post a Comment

0 Comments