'किल्ले पाहिलेला माणूस' माहितीपट पाहण्यासाठी डोंबिवलीकरांचा उस्फुर्त प्रतिसादडोंबिवली ( शंकर जाधव ) १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रविवारी सकाळी आठ वाजता मधुबन सिनेमा येथे "किल्ले पाहिलेला माणूस" गोपाळ निळकंठ दांडेकर हा स्फूर्तिदायी माहितीपट प्रदर्शित करण्यात आला.किल्ले पाहिलेला माणूस हा माहितीपट प्रथमच मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी डोंबिवलीकर रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद दिला.
   

याप्रसंगी गिर्यारोहण क्षेत्रात अनेक वर्षे यशस्वीपणे कार्यरत असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघचे सदस्य  राहुल मेश्राम, छत्रपती पुरस्कार विजेते प्रदीप केळकर,गिर्यारोहक व गोनिदांच्या साथीने दुर्ग भ्रमण करणाऱ्या विद्या हुलस्वार,अनिल चव्हाण, दगडू बोडके आदी मान्यवर  उपस्थित होते. 


माउंटेनिअर्स असोशिएशन डोंबिवली या संस्थेतर्फे ,रोटरी क्लब डोंबिवली पश्र्चिम , टिळकनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि विरा थिएटर्स या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित या कार्यक्रमात मॅडचे अध्यक्ष सतीश गायकवाड ,रोटरीचे शैलेंद्र गुप्ते, व टिळकनगर गणेशोत्सव मंडळाचे संदीप वैद्य यांच्या उपस्थितीत मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. याप्रसंगी विद्या हुलस्वार यांनी आपले अनुभव सांगितले .डॉ.अमित कुलकर्णी व सदानंद थरवळ यांचे सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले.


संस्थेचे सचिव दिलीप भगत ,संतोष कुऱ्हाडे आणि माउंटेनिअर्स असोशिएशन डोंबिवलीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.सुमारे चारशे रसिकांनी या माहितीपट पहिला.

Post a Comment

0 Comments