पाण्यासाठी माझ्या मुलांनी वणवण केली आणि अखेर त्यांची ही वणवण थांबली. माझी मुलं मला कशी परत मिळतील ..त्या पित्याचा सरकारला प्रश्न..... त्या पित्याचा टाहो..


डोंबिवली ( शंकर जाधव )  कल्याण ग्रामीण भागात पाणी टंचाईची भीषण परिस्थितीची सर्व पक्षातील नेतेमंडळींना आहे.27 गावातील ही परिस्थिती बदलण्यासाठी राजकीय पक्ष कमी पडत आहेत की काय अशी ओरड सुरू झाली आहे.पाण्यासाठी खदाणीत गेलेल्या एका कुटूंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या वेळी कल्याण ग्रामीण भागातील संदीप गावात घडली.


त्या कुटुंबावर ओडवलेले दुःख पाहून गावकरी संतप्त झाले आहेत.पाण्यासाठी माझ्या मुलांनी वणवण केली आणि आज अखेर  त्यांची ही वणवण थांबली. माझी मुलं मला कशी परत मिळतील असे त्या पित्याचे मन हेलवणारी शब्द ऐकून ही परिस्थिती कोणामुळे आली? कोण या परिस्थितीला जबाबदार असा प्रश्न येथील नागरिकांनी सरकारला विचारला आहे.


कल्याण ग्रामीण संदप   उसरघर नजीक  जवळील एका खदाणीत पडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला.अपेक्षा गौरव गायकवाड - रा.देसलेपाडा मयुरेश्वर मंदिरा  जवळ (वय 30  )  2)  मिल्स सुरेश गायकवाड ( वय 55)   3) मयुरेश मनीष गायकवाड (वय 15 ) 4) मौक्षा मनीष गायकवाड (वय 15) 5) सिद्धेश कैलास गायकवाड (वय 15) असे मृत्यू पावलेल्यांची नावे
आहेत. हे पाचजण शनिवारी दुपारी कपडे धुण्यासाठी नदिवर गेले असता कपडे धूत असताना छोट्या मुलाचा पाय घसरून तो खदानीत पडला आणि त्याला वाचवण्यासाठी इतर पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. 


ही घटना समजताच गावातील लोक खदानीजवळ जमा जझाले होते.  ठाणे जिल्हा हा संपूर्ण मुंबईची तहान भागविणारा जिल्हा आहे. बारवी, तानसा, भातसा, मध्य वैतरणा यासारखी धरणे ठाणे जिल्ह्यात बांधली गेली. त्यानंतर संपूर्ण मुंबई या धरणातून आलेले पाणी पीत असली तरी ठाणे जिल्हा मात्र अद्यापही पाणी टंचाईच्या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकला नाही. 
 
   
 चौकट

गावात भेडसावणारी पाणी टंचाईला कोण जबाबदार ?
पाण्यासाठी जीव गेला ही घटना आजच्या राजकीय पक्षांना बरच काही शिकवते.ज्या जनतेला पाणी देऊ शकत नाही अश्या राजकीय पक्षांना मतदान का करावे असा प्रश्न या घटनेनंतर नागरिकांच्या मनात निर्माण झालं आहे.सत्ताधारी असो की विरोधी पक्ष हे जनतेला उत्तर देण्यास बंधनकारक आहे.

Post a Comment

0 Comments