जिल्हा स्केटिंग स्पर्धेत मीरारोड विजेते तर कल्याण उपविजेता


कल्याण : रीजन्सी ग्रुपस्केटिंग असोसिएशन ऑफ कल्याण तालुका व स्पोर्ट्स केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी जिल्हास्तरीय रीजन्सी ट्रॉफी२०२२  ही स्केटिंग स्पर्धा रविवारी शहाडच्या रीजन्सी अंटालिया  येथे पार पडली. या स्पर्धेत मीरा रोडच्या स्केट लाइफ क्लबने १४०  गुणांसह स्पर्धेचे विजेतेपद तर कल्याणच्या सागर क्लब ने ६५ गुणांसह उपविजेतेपद पटकावले. बदलापूरच्या गार्गी क्लबला ४० गुणांसह तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.



 ही स्पर्धा क्वाडबिगीनर्स व इनलाइन या स्केटिंग प्रकारामध्ये घेण्यात आली. स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभासाठी रीजन्सी ग्रुपचे डायरेक्टर विकी रुपचंदानीग्लोबल कॉलेजच्या प्राचार्य सुप्रिया नायकर हे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गितेश वैद्यदेव गायकवाड – डोंबिवली,  संतोष मिश्रा - मीरा-भाईंदरसंतोष चव्हाणगणेश बागुल - बदलापूरसागर कुलदीपपवन ठाकूरगुफरान शेख दीपक कुलदीप अपर्णा सेतुरमान  सर्व कल्याण आदित्य निकाळजे टिटवालायांनी मेहनत घेतली. या स्पर्धेचे आयोजन स्केटिंग सचिव अविनाश ओंबासे यांनी केले होते.



स्पर्धेमधील पदक विजेते काही खेळाडू - आध्या कामथ, अन्विता बुटे, रितीशा प्रतिहारअंश वर्मा, रितेश रेड्डी, अव्यक्त भाबल, देवांश प्रधान, अदिना शाह, अर्जित जोयाशी, अंश साळुंखे, आद्य बरनवाल, सास्वत परीदातुष्य चुडासमा, अर्णव थोरातदेव विश्वकर्माजिया जियालअरमान सय्यद, जपज्योत कौरप्रेम तानासायना शकरुदर पिंपळामुर्णमय पाटील, तनुष नायर

Post a Comment

0 Comments