डोंबिवली एमआयडीसी मधील एका कंपनीत भीषण आग...

 


डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली एमआयडीसीचे फेज 2 मधील एचपी वर्क्स (W234) या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागण्याची घटना घडली.याला सुदैवाने कोणतीही जिविहानी झाली नाही. मात्र कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. 


         कंपनीला आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेनाही. डोंबिवली एमआयडीसी अभिनव शाळेजवळ, एम.आय.डी.सी. फेज क्रमांक-२, डोंबिवली एच.पी. वर्क कंपनीत ( अँटीजन टेस्टकरिता वापरण्यात येणाऱ्या सामानाचा साठा) या कंपनीमध्ये आग लागली होती.


          घटनास्थळी कल्याण-डोंबिवली एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे जवान,फायर वाहन व दोन पाणी टँकरसह यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास  आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले.
 

Post a Comment

0 Comments