पालिकेच्या पथका कडून फेरीवाल्यांच्या सामानाची नासधूस

■जाणीव पूर्वक कारवाई करत असल्याचा फेरीवाल्यांचा आरोप


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क प्रभाग क्षेत्राच्या वतीने कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरातील हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र हि कारवाई करताना फेरीवाल्यांच्या सामानाची नासधूस करण्यात आली असून हि कारवाई जाणीवपूर्वक केली आहे. याच परिसराच्या बाजूला लागुला असलेल्या दुधनाका परिसरात कारवाई केली नसल्याचा आरोप येथील फेरीवाल्यांनी केला आहे.


       गुरुवारी दुपारच्या सुमारास केडीएमसीच्या क प्रभाग क्षेत्रातील कर्मचार्यांनी पारनाका येथील फळांच्या आणि इतर हातगाड्यांवर कारवाई केली. या ठिकाणी आम्ही अनेक वर्षांपासून व्यवसाय करत असून या हातगाड्या आतील बाजूला असतांना देखील हि कारवाई केली आहे. 


       हि कारवाई करतांना या हातगाड्यांवरील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यात हि तिसरी कारवाई असल्याचे या फेरीवाल्यांचे म्हणणे असून पालिकेने केलेल्या या कारवाईमुळे याठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.  


Post a Comment

0 Comments